Church zoombombed by pornograpy during bible study case filed api
Zoom वर सुरू होता धार्मिक क्लास, अचानक सुरू झाला पॉर्न व्हिडीओ आणि.... By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 1:28 PM1 / 10कॅलिफोर्निया राज्यातील सॅन फ्रान्सिस्को शहरात ऑनलाइन बायबल क्लास दरम्यान अचानक पॉर्न व्हिडीओ सुरू झाला. ज्यामुळे एकच गोंधळ उडाला. याचा शेकडो लोकांना मनस्तापही झाला. त्यानंतर बायबल क्लासचं आयोजन करणाऱ्या चर्चेने ऑनलाइन व्हिडीओ कॉल करणाऱ्या कंपनीवर केस दाखल केली आहे. (Image Credit : Bloomberg)2 / 10सॅन फ्रान्सिकोतील सर्वात जुनं शहर सेंट पॉलस लुथेरन चर्चने झूम व्हिडीओ चॅटच्या माध्यमातून बायबल क्लासचं आयोजन केलं होतं. धर्मगुरू बायबलबाबत सांगत होते. तर लोक आपापल्या घरात कॉम्प्युटर आणि मोबाइलवर क्लास अटेंड करत होते. अचानक स्क्रिनवर पॉर्न व्हिडीओ सुरू झाला. 3 / 10या व्हिडीओत वयस्क लोक लहान मुलांसोबत शारीरिक संबंध ठेवत असल्याचं दाखवत होते. यात लहान मुलांचं शारीरिक शोषण केलं जात होतं. त्यानंतर लगेच झूमवर सुरू असलेला बायबल क्लास बंद करण्यात आला. 4 / 10नंतर सेंट पॉलस लुथेरन चर्चकडून फेडरल कोर्टात झूम व्हिडीओ कम्युनिकेशनवर धार्मिक कार्यात अडथळा निर्माण केल्याबाबत केस करण्यात आली. चर्चच्या व्यवस्थापकांनी सांगितले की, बायबल क्लास दरम्यान बरेच वयोवृद्ध लोक ऑनलाइन होते.5 / 10याबाबत झूम कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, हॅकरने तो क्लास हॅक करून पॉर्न व्हिडीओ दाखवला होता. आम्ही त्या हॅकरची ओळख पटवली आहे आणि त्याचा झूम अॅक्सेस ब्लॉक केलाय. 6 / 10सोबतच या हॅकरची माहिती संबंधित कायदेशीर संस्थांना देण्यात आली आहे. घडलेल्या घटनेबाबत आम्हाला दु:खं आहे. (Image Credit : Freepik)7 / 10सोबतच प्रवक्त्यांनी सांगितले की, कंपनीने त्यांचे सिक्युरिटी फिचर्स अपडेट केले आहेत. पण जर लोक फार मोठ्या प्रमाणात पासवर्ड शेअर करतील तर कोणत्याही प्रकारची समस्या होऊ शकते.8 / 10कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन दरम्यान जास्तीत जास्त लोक झूम अॅपचा वापर करू लागले आहेत. लोक यावर त्यांच्या मींटींग्स करत आहेत. अनेक क्लासेसही त्यावरच होत आहेत.9 / 10सेंट पॉलस लुथेरन चर्च सॅन फ्रान्सिस्कोतील सर्वात जुन्या चर्चपैकी एक आहे. हा बायबलचा क्लास 6 मे रोजी झाला होता. त्यानंतर चर्चने कंपनीला कोर्टात खेचले10 / 10चर्चकडून घेण्यात आलेल्या क्लासमध्ये वयोवृद्ध लोक होते. हॅकर जे लोक क्लास सोडून पुन्हा जॉइन करत होते त्यांना पुन्हा पॉर्न व्हिडीओ दाखवत होता. आता कंपनीने त्यांचे सिक्युरिटी फिचर्स अपडेट केल्याचा दावा केला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications