शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वाळवंटात बांधले चित्रपटगृह, पण आजपर्यंत एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही; जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 12:46 PM

1 / 4
जगात अनेक अशा इमारती किंवा ठिकाणे आहेत, ज्या लोकांसाठी मोठं आकर्षणाचं केंद्र बनल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा अनोख्या ठिकाणाबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल जाणून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकीत व्हाल. आज आम्ही तुम्हाला एका चित्रपटगृहाबद्दल सांगणार आहोत. हे चित्रपटगृह वाळवंटाच्या मध्यभागी बांधण्यात आलं आहे.
2 / 4
इजिप्तच्या सिनाई द्वीपकल्पाच्या दक्षिणेस एक वाळवंट आहे. यात पर्वतरांगेच्या पायथ्याशी हे अनोखे चित्रपटगृह बांधण्यात आले होते. पण, आजपर्यंत या चित्रपटगृहात एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. तुम्ही विचार करत असाल की वाळवंटात चित्रपटगृह का बांधले आणि आणि त्यात आजपर्यंत एकही चित्रपट प्रदर्शित का झाला नाही ?
3 / 4
अनेक वर्षांपासून हे चित्रपटगृह भग्नावस्थेत पडलेलं आहे. आता हे ठिकाण केवळ पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. हे थिएटर फ्रान्समधील एका व्यक्तीने बांधले होते. या माणसाकडे खूप पैसा होता, त्याला तो वाया घालवायचा होता. एके दिवशी तो त्याच्या मित्रांसह सिनाई वाळवंटात फिरण्यासाठी आला होता.
4 / 4
त्याला आपले पैसे वाया घालवायचे होते, यासाठी त्याने चित्रपटगृह बांधायचा विचार केला. त्याने कैरोहून अनेक जुन्या खुर्च्या आणि जनरेटर मिळवलं आणि एक प्रचंड स्क्रीनही बसवली. आता हे चित्रपटगृह फक्त सुरू करण्याची तयारी होती, पण तसं झालंच नाही. कारण स्थानिक लोकांना या विलक्षण सिनेमाची कल्पना आवडली नाही. यानंतर लोकांनी जनरेटरची तोडफोड केली. तेव्हापासून या चित्रपटगृहात आजपर्यंत एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीय