Coconut crab the worlds largest land crab api
जगातला सर्वात शक्तिशाली खेकडा, नांगीने एका झटक्यात हाडे अन् नारळाचं कवचही फोडू शकतो! By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 1:40 PM1 / 14सामान्यपणे जे खेकडे आपण बघतो ते छोटे असतात आणि ते फार काही कुणाला इजा करू शकत नाहीत. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा खेकड्याबाबत सांगणार आहोत ज्याला इंग्रजीत Coconut Crab असं नाव दिलं जातं. या खेकड्याचा आकारही मोठा असतो त्यामुळे त्यांना 'दैत्य' खेकडा असंही म्हटलं जातं. (All Image Credit : Social Media) 2 / 14हे खेकडे दक्षिण पश्चिम प्रशांत महासागर आणि हिंद महासागरात आढळतात. एका वयस्क दैत्य खेकड्याची लांबी १ मीटर असते आणि वजन साधारण ४.५ किलोग्रॅम असतं. 3 / 14या खेकड्यांचा रंग हलका जांभळा, भुरका आणि गर्द जांभळा असतो. मध्यम वयाचे खेकडे हे भुरक्या रंगांचे असतात आणि त्यांच्या पायांवर काळ्या रेषा असतात.4 / 14सामान्यपणे दैत्य खेकडा सडलेले पदार्थ खातात. ते झाडाची पडलेली पाने, सडलेली फुले आणि इतर खेकड्यांचे कवच खातात. हा खेकडा त्याच्या एका खास गुणासाठीही ओळखला जातो. याचा नोकदार नांगी शक्तीशाली असतो. 5 / 14या नांगीच्या मदतीने सर्वात मोठा खेकडा ३ हजार ३०० न्यूटन शक्ती म्हणजे साधारण ७४२ पौंड फोर्स लावू शकतो. हा खेकडा नारळाचं मजबूत कवचही तोडू शकतो. 6 / 14अनेकदा नारळाच्या झाडांवरून हे खेकडे नारळं खाली पाडतात आणि ते हे त्यांच्या नांगीने करतात. त्यामुळे इंग्रजीत या खेकड्याला Coconut crab असं म्हणतात.7 / 14या खेकड्यांचा जन्म कसा होतो हेही आश्चर्यकारक आहे. मादा खेकडा अंडी देते आणि त्यातून एक अळीसारखा कीटक बाहेर येतो. ही अळी आधी पाण्यात नंतर शिंपल्यांमध्ये राहते. तीन ते चार आठवडे त्यात राहते. त्यानंतर कवच फेकते आणि नंतर काही दिवस समुद्र किनारी वाळूत राहतात. 8 / 14या दैत्य खेकड्याची सुंघण्याची क्षमताही मजबूत असते. हे खेकडे जास्तकरून अंधारात बाहेर पडतात. अंधारात त्याला जेवण शोधण्यासाठी त्यांची सुंघण्याची क्षमता कामी पडते. या खेकड्यांच्या मेंदूचा एक भाग वासाकडे आकर्षित होतो. जिथून वास येईल तिकडे ते जातात.9 / 14Coconut crabs ला चोर खेकडाही म्हटलं जातं. कारण ते चांदीची भाडी आणि इतरही वस्तू उचलून नेतात. पण ते घाणेरडी भांडीच घेऊन जातात, ज्यांच्यातून वास येतो. याचं हे कारण आहे की, हे खेकडे जास्तकरून सडलेले पदार्थ, वस्तू खातात. त्यांकडे ते आकर्षित होतात. 10 / 14भांड्यांमधूनही त्यांना वास येतो तेव्हा त्यांना वाटतं की, ती खाण्याची वस्तू आहे. असेही सांगितले जाते की, ते कधीच स्वच्छ आणि धुतलेली भांडी नेत नाहीत. 11 / 14अमेरिकेतील प्रसिद्ध महिला पायलट आणि लेखक अमेलिया इअरहार्टच्या बेपत्ता होण्यातही या खेकड्यांचं नाव घेतलं जातं. असे सांगितले जाते की, अमेलिया इअरहार्टचा मृतदेह हेच खेकडे घेऊन गेले होते.12 / 14अमेरिकेतील प्रसिद्ध महिला पायलट आणि लेखक अमेलिया इअरहार्टच्या बेपत्ता होण्यातही या खेकड्यांचं नाव घेतलं जातं. असे सांगितले जाते की, अमेलिया इअरहार्टचा मृतदेह हेच खेकडे घेऊन गेले होते.13 / 14अमेरिकेतील प्रसिद्ध महिला पायलट आणि लेखक अमेलिया इअरहार्टच्या बेपत्ता होण्यातही या खेकड्यांचं नाव घेतलं जातं. असे सांगितले जाते की, अमेलिया इअरहार्टचा मृतदेह हेच खेकडे घेऊन गेले होते.14 / 14अमेरिकेतील प्रसिद्ध महिला पायलट आणि लेखक अमेलिया इअरहार्टच्या बेपत्ता होण्यातही या खेकड्यांचं नाव घेतलं जातं. असे सांगितले जाते की, अमेलिया इअरहार्टचा मृतदेह हेच खेकडे घेऊन गेले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications