शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coconut Husk : अत्यंत उपयोगी आहेत निरुपयोगी समजून फेकून दिल्या जाणाऱ्या नारळाच्या शेंड्या, फायदे जाणून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 8:54 PM

1 / 6
नारळाचे फायदे तर सर्वांनाच माहीत आहेत. नारळाचा रोजच्या आहारात वापर केल्यास, केस आणि त्वचा टवटवीत राहते. पण याच नारळाच्या शेंड्या आपण निरुपयोगी समजून फेकून देतो. खरे तर, या सालीचा वापर करून आपण आपल्या अनेक समस्या सोडवू शकता. तर जाणून घेऊयात नारळाच्या शेंड्यांचे खास फायदे.
2 / 6
सूज कमी होते - दुखापत झाल्यानंतर आपण अनेक वेळा खोबऱ्याचे तेल वापरतो. आपण सुजलेल्या ठिकाणी खोबऱ्याचे तेलही लावतो. मात्र, आपण नारळाच्या सालीनेही सूज दूर करू शकतो. नारळाच्या सालीची पावडर करून ती हळदीत मिसळून सुजलेल्या जागेवर लावू शकता.
3 / 6
दात चकचकीत करते - लोकांमध्ये दात पिवळे पडण्याची समस्या सामान्य आहे. आपण नारळाच्या सालीचा वापर करूनही दातांचा पिवळसरपणा दूर करू शकता. यासाठी नारळाच्या शेंड्या जाळून त्याची पावडर बनवा आणि या पावडरमध्ये सोडा मिसळवून दातांवरून हलक्या हाताने मालीश करा.
4 / 6
केस होतील काळे - नारळाच्या शेंड्या पांढरे केस काळे करण्यासाठीही उपयुक्त आहे. नारळाच्या साली कढईमध्ये गरम करून त्याची पावडर तयार करा. ही पावडर खोबऱ्याच्या तेलात एकत्र करा. हे तेल केसांना लावल्याने केस काळे होतात. हे तेल लावल्यानंतर एका तासाने केस केस धुवा.
5 / 6
पीर‍ियड्समध्येही मिळतो आराम - नारळाच्या सालीमुळे मासिक पाळीच्या त्रासातही आराम मिळतो. नारळाच्या शेंड्या जाळून बारीक पावडर तयार करा. ती पाण्यासोबत प्यायल्याने वेदना कमी होतात.
6 / 6
(टीप - येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. हिचा अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. आम्ही याला दुजोरा देत नाही.)
टॅग्स :Healthआरोग्यJara hatkeजरा हटके