शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Valentine ला गुलाबापेक्षाही 'या' वस्तूची झाली रेकॉर्डब्रेक विक्री; ऐकून हैराण व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 7:59 PM

1 / 10
व्हॅलेंटाईन डे. दरवर्षी १४ फेब्रुवारीला जगभरातील लोक आपापल्या पद्धतीने तो साजरा करतात. नुकताच झालेला व्हॅलेंटाईन डे प्रेमी युगलांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला. यादिवशी प्रेयसीला गिफ्ट देण्यासाठी प्रियकर दुकानात गर्दी करतात. व्हॅलेंटाईननिमित्त भरपूर फुलं विकली जातात.
2 / 10
सामान्य दिवसांच्या तुलनेत या दिवशी फुलांची किंमतही खूप असते.मात्र व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने फुलांपेक्षा कंडोमची विक्री अधिक झाल्याची बातमी समोर आली आहे. ७ ते १४ फेब्रुवारी या काळात कंडोमची रेकॉर्डब्रेक विक्री झाली आहे.
3 / 10
व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रत्येक दिवसानुसार प्रेमी युगल एकमेकांना भेटवस्तू देत असत. यामध्ये टेडी डे, चॉकलेट डे, प्रपोज डे आणि नंतर व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. दरवर्षी व्हॅलेंटाईन वीकमध्ये भरपूर फुले विकली जायची.
4 / 10
व्हॅलेंटाईन वीक सुरू होण्यापूर्वी दुकानदारही विविध भेटवस्तू आणि फुलं घेऊन येतात. व्हॅलेंटाईन वीकमध्ये गिफ्ट कार्डचीही खूप विक्री व्हायची. मात्र यावेळी या सर्वांची विक्री खूपच मागे पडली आहे. कंडोम विक्रीचे आकडे पाहून सर्वांना धक्का बसेल.
5 / 10
ऑनलाइन सामान वितरण कंपनी ब्लिंकिटचे संस्थापक अलबिंदर धिंडसा यांच्या मते, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी कंडोम आणि मेणबत्त्या या दोन्हींच्या विक्रीत वाढ झाली आहे. इतर उत्पादनांमध्ये पुरुषांसाठी डिओडोरंट, महिलांसाठी परफ्यूम, सिंगल गुलाब, पुष्पगुच्छ आणि चॉकलेट्स यांचा समावेश आहे.
6 / 10
सुपरमार्केट चालवणाऱ्या FoodStuffs चे नॉर्थ आयलँड आणि न्यूझीलंडमध्ये ३३० स्टोअर्स आणि २४००० खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेत. त्यांच्या एका अहवालानुसार, यावर्षी संपूर्ण व्हॅलेंटाईन वीकमध्ये फुलं आणि भेटवस्तूंपेक्षा कंडोमला जास्त मागणी होती.
7 / 10
यासह पर्सनल लुब्रिकेंट विक्रीत ६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या म्हणजेच २०२२ च्या तुलनेत व्हॅलेंटाईन वीकमध्ये कंडोमच्या विक्रीत २२ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा व्हॅलेंटाईन डेनं अनेकांना हैराण केले आहे.
8 / 10
'यूएस नॅशनल रिटेल फेडरेशन'च्या म्हणण्यानुसार, व्हॅलेंटाइन डेबद्दल तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आहे. लैंगिक संबंधांमुळे होणारे आरोग्य आणि आजारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १३ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय कंडोम दिवस देखील साजरा केला जातो.
9 / 10
हा दिवस साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कंडोम खरेदी केले जातात. पाश्चात्य देशांमध्ये कंडोम बनवणाऱ्या कंपन्या यासाठी तयारी करतात. व्हॅलेंटाईन डेच्या आधी अनेक प्रकारच्या ऑफर्सही बाजारात आणल्या जातात जेणेकरून त्यांची चांगली विक्री व्हावी.
10 / 10
अहवालानुसार, १४ फेब्रुवारी रोजी कंडोमची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे तर यावर्षी, थायलंडने सुरक्षित लैंगिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी, किशोरवयीन गर्भधारणा टाळण्यासाठी, लैंगिक संक्रमित रोगांपासून संरक्षण करण्यासाठी सुमारे ९.५ कोटी कंडोम लोकांना वाटले.
टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डे