Coronavirus : Can't infect international space station is safest place in world api
Coronavirus : जगातलं सर्वात सुरक्षित ठिकाण, 'या' ठिकाणी अजिबात नाही कोरोनाचा धोका! By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 11:17 AM1 / 14जगातल्या साधारण 164 देशांमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. 2 लाखांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत तर 8 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय. पण जगात एक असंही ठिकाणी आहे जे सर्वात सुरक्षित आहे. 2 / 14तसेच इथे कोणत्याही प्रकारच्या आजाराचा प्रभाव होत नाही. कारण इथे हेल्थ स्टॅबिलायझेन प्रोग्राम अनेक वर्षांपासून चांगल्या प्रकारे काम करत आहे.3 / 14अमेरिकन अंतराळ संस्था नासाने सांगितले की, जगातल्या या सर्वात सुरक्षित ठिकाणावर कधीच कुणी आजारी पडत नाही. इथे केवळ एकदा एकाला सर्दी झाली होती. ती सुद्धा 52 वर्षांआधी. या ठिकाणाचं नाव आहे आतंरराष्ट्रीय स्पेप सेंटर.4 / 14नासाने सांगितले की, आता जर एखाद्या अंतराळवीराला अंतराळात पाठवायचं असेल तर आम्ही 10 दिवस त्याची मेडिकल टेस्ट करू. जेणेकरून स्पेस स्टेशनवर कोरोना व्हायरसचं संक्रमण होऊ नये. 5 / 14नासा मे महिन्यात स्पेस-एक्सच्या रॉकेटने अंतराळ प्रवाशांना स्पेस स्टेशनवर पाठवणार आहे.6 / 14नासाने हेही सांगितले की, कशाप्रकारे त्यांना स्पेस स्टेशनला आजारांपासून दूर ठेवलं आहे. नासाकडे स्पेस स्टेशन सुरक्षित ठेवण्यासाठी एक सिस्टीम आहे. 7 / 14याला हेल्थ स्टॅबिलायझेशन असं म्हणतात. या सिस्टमच्या माध्यमातून स्पेस सेंटरमधील लोक त्यांच्या आरोग्याची काळजी घेतात.8 / 141968 मध्ये झालेल्या अपोलो-7 मिशनदरम्यान वॅली शीराला सामान्य सर्दी झाली होती. पण यामुळे त्यांच्या साथीदारांना फार अडचण होत होती. वॅली जेव्हाही शिंकत होते तेव्हा त्यांच्या नाकातून निघणारे थेंब स्पेसशिपमध्ये तरंगत होते. हे थेंब इतरांना अडचणीचे ठरत होते.9 / 14त्यानंतर नासाने निर्णय घेतला की, ते स्पेस स्टेशनवर अशी टेक्नॉलॉजी विकसित करतील, ज्याने कुणी आजारीच पडणार नाहीत. कोणत्याही वैज्ञानिकांना कोणत्याही प्रकारचं संक्रमण होणार नाही. नासाने स्पेस सेंटरला डॉक्टर पाठवणे सुरू केले.10 / 14स्पेस सेंटरवर पूर्वी कुणी आजारी पडलं तर त्यांना क्वॉरेंटाइन केलं जात होतं. तिथे त्यांना स्लीपिंग बॉक्स किंवा कॅप्सूलमध्ये बंद केलं जात होतं. 11 / 14त्यातच त्यांच्यावर उपचार केले जात होते. जेव्हा ते बरे होत असत तेव्हा त्यांना बाहेर काढलं जात होतं.12 / 14स्पेस सेंटर वेळोवेळी सॅनिटाइज केलं जातं. यासाठी तिथे मशीन्स आणि केमिकल्स ठेवले जातात. गरज पडेल तेव्हा केवळ एक बटन दाबून संपूर्ण स्पेस सेंटर सॅनिटाइज होतं.13 / 14स्पेस सेंटरवर मनुष्यांसोबत मायक्रोब्स आणि बॅक्टेरिया तर जातात. पण आतापर्यंत असा व्हायरस गेला नाही ज्याने कुणी आजारी पडतील. स्पेस स्टेशनवर लाइफबोट्ससारखी सुविधाही असते. जर काही इमरजन्सी आली तर तेथून लोक बाहेर पडू शकतात.14 / 14स्पेस सेंटरवर मनुष्यांसोबत मायक्रोब्स आणि बॅक्टेरिया तर जातात. पण आतापर्यंत असा व्हायरस गेला नाही ज्याने कुणी आजारी पडतील. स्पेस स्टेशनवर लाइफबोट्ससारखी सुविधाही असते. जर काही इमरजन्सी आली तर तेथून लोक बाहेर पडू शकतात. आणखी वाचा Subscribe to Notifications