शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus : लॉकडाऊनचं टेंशन येत असेल, तर घरी राहण्याचे 'हे' फायदे वाचून आनंदी रहा....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 6:34 PM

1 / 10
सध्या कोरोना व्हायरस भारतात झपाट्याने पसरत असल्यामुळे सरकारने अधिकाधिक लोकांना सुरक्षित ठेवता यावं यासाठी लॉकडाऊन केला आहे. अशा परिस्थितीत अनेकांना लॉकडाऊन कधी संपणार आणि कधी घराबाहेर पडता येणार या गोष्टीचं टेंशन आलं आहे. आज आम्ही तुम्हाला घरात असण्याचे फायदे काय असतात याबाबत सांगणार आहोत.
2 / 10
लोकांचा वावर नसल्यामुळे पर्यावरण चांगलं राहत आहे. स्वच्छता दिसून येत आहे.
3 / 10
निरूपयोगी सामान काढून टाकणं- तुम्हाला घरी चांगला वेळ मिळत असल्यामुळे नको असलेलं सामान तुम्ही घरातून काढून टाकू शकता. त्यामुळे घर स्वच्छ होईल.
4 / 10
ऑनलाईन कोर्समधून नवीन शिका- अनेक ऑनलाईन कोर्स आहेत. ज्यातून तुम्हाला विनामुल्य ज्ञान घेता येऊ शकतं. फक्त काही तास वेळ यासाठी तुम्हाला द्यावा लागणार आहे. त्यातून तुम्ही इन्जॉय करत करत शिकू शकता.
5 / 10
फॅमिली टाईम कुंटूबासोबत चांगलं बॉडींग होत आहेत. तसंच घरातील मोठ्या लोकांशी तुमचं बोलणं होत आहे. त्यामुळे विचारांची देवाण-घेवाण होत आहे. तसंच तुम्हाला चांगली कंपनीसुद्धा मिळत आहे.
6 / 10
खर्चावर नियंत्रण आहे -गेल्या एका आठवड्यापासून अनेक लोक घरीच असल्यामुळे अनावश्यक जो खर्च आपल्या सगळ्यांकडून केला जातो. त्याला लगाम लागलेली आहे. फक्त गरजेच्या वस्तुंसाठीच तुमचा खर्च होतो. त्यामुळे तुमची बचत होत आहे. म्हणून पॅनिक न होता लॉकडाऊनमध्ये आपण खर्च टाळत असल्याची भावना मनात ठेवा.
7 / 10
नवीन दृष्टीकोन- घरात बंद असल्यामुळे अनेकांमधले कलाकार बाहेर आले आहेत. लोक आपला वेळ कुंटुंबासोबत गप्पा मारण्यात, खेळ खेळण्यात आणि छंद जोपासण्याासाठी देत आहेत. असावेळ तुम्हाला कधीही मिळाला नसता. म्हणून या वेळेचा वापर करून आनंदी रहा.
8 / 10
फॅमिली टाईम- कुंटूबासोबत चांगलं बॉडींग होत आहेत. तसंच घरातील मोठ्या लोकांशी तुमचं बोलणं होत आहे. त्यामुळे विचारांची देवाण-घेवाण होत आहे. तसंच तुम्हाला चांगली कंपनीसुद्धा मिळत आहे.
9 / 10
अनेकांनी पहिल्यांदाच वर्क फ्रॉम होम केलं असेल त्यामुळे तुम्हाला तुमच्यातील कार्यक्षमतेचा अंदाज आला असेल. यानंतर सुद्धा तुम्ही कधीही तुमच्यामनाप्रमाणे काम करू शकता.
10 / 10
क्रिएटिव्ह कुंकिंग-लॉकडाऊनमुळे तुम्ही चांगले पदार्थ घरच्याघरी ट्राय करत असाल तर एक वेगळा आनंद तुम्हाला होईल तसंच घरातील मंडळी सुद्धा तुमच्यावर खुश असतील.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके