Coronavirus: Lockdown forces teen to bring friend to his apartment in a suitcase pnm
Coronavirus: लॉकडाऊनमध्ये मित्राला भेटण्यासाठी ‘त्याने’ लढवली भन्नाट शक्कल; पण झाली ‘अशी’ पोलखोल By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 7:34 PM1 / 11देशभरात कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा पाहून १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केले. कोरोना संक्रमण साखळी तोडण्यासाठी हे महत्त्वाचं आहे असं त्यांनी लोकांना सांगितले. 2 / 11गेल्या १५ दिवसांहून अधिक काळ लोकांना घरातून बाहेर पडू नये यासाठी वारंवार विनंती केली जात आहे. तरीही काही लोक विनाकारण घराबाहेर पडत असल्याचं दिसून आलं.3 / 11अनेकदा पोलिसांनी विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांवर कारवाई करत त्यांच्या दंडुक्याचा प्रसादही दिला. तर काही वेळा गांधीगिरी मार्गाने त्यांना समजवण्याचा प्रयत्नसुद्धा केला. 4 / 11देशात १४ एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. अनेक राज्यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणाही केली आहे. 5 / 11कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाउन सुरूच आहे. लोकांना त्यांच्या घरात राहण्याची सक्ती केली जाते. अशा परिस्थितीत लोक आता पोलिस व प्रशासनाच्या कडक कारवाईला टाळून लॉकडाऊन उल्लंघन करण्याचा नवी शक्कल लढवत आहेत. 6 / 11कर्नाटकातील मंगळुरुमध्येही असेच काही घडले ज्यामध्ये एका मुलाला घरी मन लागत नव्हते आणि त्याला आपल्या मित्राला भेटण्याची इच्छा झाली. परंतु रस्त्यावर पोलिसांच्या तत्परतेमुळे तो घराच्या बाहेर पडू शकत नव्हता. 7 / 11अशा कठीण परिस्थितीत एका मित्राने दुसर्या मित्राला भेटण्यासाठी लढवलेली शक्कल पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.8 / 11एका युवकाने मित्राला भेटायला सुटकेसमध्ये स्वत: ला लॉक केले आणि त्यानंतर दुसरा मित्र येऊन त्याने त्या सुटकेसला आपल्या अपार्टमेंटमध्ये नेले. तिथे त्याने आपल्या मित्राला सुटकेसमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताच तो पकडला गेला. ही घटना आर्य समाज रोडवरील एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्सची आहे.9 / 11लॉकडाऊनच्या नियमांमुळे अपार्टमेंटमध्ये नवीन लोकांच्या प्रवेशावर कठोर बंदी घातली होती. आपल्या मित्राला फ्लॅटवर आणण्यासाठी विद्यार्थ्याने ही योजना बनविली आहे. 10 / 11मित्राला एका मोठ्या सूटकेसमध्ये लपविला आणि जेव्हा ती सुटकेस अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये आणत होती, तेव्हा तो अडखळला आणि लोकांना त्याच्याविषयी संशय निर्माण झाला.11 / 11जेव्हा संशयास्पद वाटल्यानंतर अपार्टमेंटमधील लोकांनी सूटकेस उघडला तेव्हा एक व्यक्ती त्यातून निसटल्याचे पाहून लोकांना आश्चर्य वाटले. लोकांनी तातडीने पोलिसांना कळवले, त्यानंतर दोन्ही मित्रांना कादरी पोलिस ठाण्यात चौकशीसाठी नेले. आणखी वाचा Subscribe to Notifications