शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : धक्कादायक! कोरोनाची लागण व्हावी या उद्देशानेच 'इथे' पार्टीत जाताहेत लोक...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2020 1:22 PM

1 / 10
कोरोना व्हायरसच्या केसेस जगभरात दिवसेंदिवस वाढतच आहेत. अमेरिकेत कोरोनाचं सर्वात जास्त थैमान बघायला मिळत आहे. सर्वात जास्त लोकांचा जीव इथेच कोरोनाने घेतलाय. शनिवार सकाळपर्यंत येथील मृतांचा आकडा 77 हजारावर गेलाय.
2 / 10
दरम्यान अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन तोडण्याच्या आणि सोशल डिस्टंसिंग न पाळण्याच्या घटनाही समोर येत आहेत. अशात अमेरिकेतील अधिकारी 'कोरोना पार्टी' मुळे चिंतेत आहेत. (Image Credit : bloomberg.com) (सांकेतिक छायाचित्र)
3 / 10
एएफपीच्या रिपोर्टनुसार, वॉशिंग्टनच्या वाल्ला वाल्ला काउंटीच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, या भागात कोरोनाच लागण झालेले 100 अशा केस समोर आल्या आहेत ज्या कोरोना पार्टीमुळे पसरल्या आहेत. पार्टीमधे लोकांना मुद्दामहून कोरोना पसरवला आहे. (सांकेतिक छायाचित्र)
4 / 10
वॉशिंग्टनचे हेल्थ सेक्रेटरी जॉन वीसमॅन म्हणाले की, 'महामारीमधे लोकांचं एकत्र येणं धोकादायक आहे. याने जास्तीत लोक हॉस्पिटलमधे दाखल होतील आणि जास्तीत जास्त लोकांचा जीवही जाऊ शकतो'.
5 / 10
अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'कोरोनातून बरे झालेले लोक आता बराच काळ पुन्हा आजारी पडणार की नाही याबाबतही सध्या काही माहिती नाही'.
6 / 10
वीसमॅन असेही म्हणाले की, काही काळानंतर आपल्या शरीरावर व्हायरसचा काय परिणाम होणार याबाबतही काहीच सांगता येणार नाही.
7 / 10
वीसमॅन असेही म्हणाले की, काही काळानंतर आपल्या शरीरावर व्हायरसचा काय परिणाम होणार याबाबतही काहीच सांगता येणार नाही.
8 / 10
कोरोना व्हायरसच्या नावावर होणाऱ्या पार्ट्यांमध्ये जे लोक संक्रमित आहेत ते संक्रमित नसणाऱ्या लोकांसोबत बसतात. जेणेकरून त्यांनाही कोरोनाची लागण व्हावी.
9 / 10
अशाप्रकारच्या वागण्याने कोरोनाच्या केसेस आणखी वाढतील आणि वॉशिंग्टनमधून लॉकडाऊन हटवण्यासही उशीर लागेल, अशी चिंता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
10 / 10
वाल्ला वाल्ला काउंटीच्या कम्युनिटी हेल्थ डायरेक्टर मेघन डिबोल्ट सांगतात की, 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंगने हे समोर आले आहे की, अनेक संक्रमित लोक पार्टीमधे पॉझिटिव्ह होण्याच्या उद्देशानेच सामिल झाले होते.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका