कोरोना व्हायरसपेक्षा महाभयंकर होतं स्पॅनिश फ्लूचं संकट, फोटो पाहून व्हाल हैराण By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 6:40 PM
1 / 13 सध्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. ही महामारी कधी संपेल याबाबत याबद्दल कोणालाही काहीही कल्पना नाही. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झालं आहे. लोकांचा जीव वाचावा यासाठी शासनाकडून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. 2 / 13 १९१८ ला सुद्धा कोरोनापेक्षा महाभयंकर स्पॅनिश फ्लूची माहामारी आली होती. या महामारीमुळे जवळपास ५ कोटींपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. 3 / 13 या जीवघेण्या माहामारीचे काही फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. कोरोनाच्या या महाभयंकर महामारीत स्पॅनिश फ्लूची आठवण होत आहे. 4 / 13 अमेरिकेतील लॉयोला विद्याविद्यापीठातील रिसर्चकर्त्यांनी दावा केला आहे की १९१८ ते १९ या काळात स्पॅनिश फ्लूची महामारी पसरली होती. त्यावेळी लॉकडाऊनसारखा मोठा निर्णय घेण्यात आला होता. ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त क्वारंटीन होते. त्याठिकाणचा मुत्यू दर कमी होता. 5 / 13 स्पॅनिश फ्लूच्या महामारीमुळे जगातील जवळपास एक तृतियांश लोकसंख्या प्रभावित झाली होती. कोट्यावधी लोकांचा मृत्यू सुद्धा झाला होता. त्यावेळी शाळा बंद करणं, जमावबंदी, मास्कचा वापर, साफ-सफाई असे वेगवेगळे उपाय या आजाराला रोखण्यासाठी यशस्वी ठरले होते. 6 / 13 अमेरिकन सोसाइटी ऑफ साइटोपॅथोलॉजीच्यामते अमेरिकेतील शहरांमध्ये सन फ्रांन्सिस्को, सेंट लुईस आणि मिलवाकी, कंकास मध्ये मृत्यूदर ३० ते ५० टक्क्यांनी कमी होता. ज्या शहरांमध्ये उशीरा लॉकडाऊन करण्यात आलं होतं. अशा शहरांमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले होते. 7 / 13 त्यावेळी लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे लोकांना असं वाटत होतं की सरकारचा निर्णय योग्य नाही. अमेरिकेत स्पॅनिश फ्लूमुळे ६.७५ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. पैम्बुसिन यांच्यामते १९१८ मध्ये महायुध्द चालू होते. त्यामुळे अमेरिकेला गरीबी, कुपोषण यांचा सामना करावा लागत होता. 8 / 13 वैद्यकिय सेवा सुद्धा फारश्या प्रभावित नव्ह्त्या. पण त्यावेळच्या तुलनेत सध्याच्या परिस्थितीत अनेक बदल झालेले आहेत. १९१८-१९ च्या महामारीच्यावेळी उचललेली पाऊलं लक्षात घेऊन कृती केल्यास कोरोना व्हायरस सारख्या मोठ्या आजाराला नियंत्रणात करता येईल. 9 / 13 ( image credit- scoopwhoop.com) 10 / 13 ( image credit- scoopwhoop.com) 11 / 13 ( image credit- scoopwhoop.com) 12 / 13 ( image credit- scoopwhoop.com) 13 / 13 ( image credit- scoopwhoop.com) आणखी वाचा