1 / 10सध्या देशात कोरोनाचं संकट उभं राहिलं आहे. अशातच देशव्यापी लॉकडाऊन सुरु असल्याने पोलिसांवरचा ताण वाढला आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून पोलिस जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावर उभे आहेत. अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचंही समोर आलं आहे.2 / 10लॉकडाऊन तोडल्यामुळे अनेकांना पोलिसांनी मारल्याचं, शिक्षा दिल्याचं व्हायरल झालं आहे. पण काही महाभागांना या शिक्षेची गरजही आहे. पण पोलिसांच्या या मारहाणीचा काहींना निषेध पण केला आहे.3 / 10लॉकडाऊन काळात पोलिसांच्या विविध रुपाचं दर्शन सर्वांना होत आहे. काही ठिकाणी कठोर तर काही ठिकाणी माणुसकीचं दर्शन पोलिसांच्या रुपात पाहायला मिळत आहे. भूकेल्यांना अन्न देण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येत आहे.4 / 10सध्या सोशल मीडियावर डिब्रूगड पोलिसांचा फोटो व्हायरल होत आहे. ११ मे रोजी पोलिसांनी त्याच्या ट्विटर हँडलवरुन हा फोटो शेअर केला त्याला हजारोंच्या संख्येने लाईक्स आणि रिट्विट करण्यात आलं. पोलिसांच्या या कृत्याने अनेक नेटिझन्सची मनं जिंकली.5 / 10जनमोनी गोगोई ही मुलगी कुटुंबाचं पोट भरण्यासाठी सायकलवरुन भाजी विकण्याचं काम करते. तिच्या आत्मविश्वासने प्रेरित होऊन पोलिसांनी तिला बाईक भेट म्हणून दिली. ज्यामुळे तिचं काम सुलभ होईल. याबाबतची माहिती पोलिसांनी ट्विटवरुन दिली आहे.6 / 10जनमोनी गोगोई ही डिब्रूगड जिल्ह्यातील बोगीबील परिसरात राहणारी आहे. तिने जिल्हा शाळेत १२ वी पर्यंत शिक्षण घेतलं आहे. 7 / 10जनमोनीला पुढील शिक्षण घेण्याची प्रचंड इच्छा होती पण घरची परिस्थिती बिकट असल्याने तिला शिक्षण सोडावं लागलं. कुटुंबीयांचं पोट भरण्यासाठी तिने सायकलवरुन भाजी विकण्याचं काम सुरु केलं.8 / 10पोलिसांनी तिच्या या आत्मविश्वासाचं कौतुक करत तिचं काम सोप्प करण्यासाठी तिला बाईक भेट म्हणून दिली. पोलिसांनी केलेल्या या कृत्याचं सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. 9 / 10पोलिसांनी तिच्या या आत्मविश्वासाचं कौतुक करत तिचं काम सोप्प करण्यासाठी तिला बाईक भेट म्हणून दिली. पोलिसांनी केलेल्या या कृत्याचं सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. 10 / 10पोलिसांनी तिच्या या आत्मविश्वासाचं कौतुक करत तिचं काम सोप्प करण्यासाठी तिला बाईक भेट म्हणून दिली. पोलिसांनी केलेल्या या कृत्याचं सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.