Coronavirus : Ugandans physical intimacy during quarantine api
Coronavirus : क्वारंटाईनमध्ये अनोळखी लोक ठेवत आहेत शारीरिक संबंध; सरकारने रूमबाहेर वाढवले गार्ड By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 10:56 AM1 / 10जगभरात सुरू असलेलं कोरोना व्हायरसचं थैंमान थांबायचं नाव घेत नाहीये. गेल्या अनेक दशकांमधील ही सर्वात भयंकर महामारी मानली जात आह. कोरोनापासून बचावासाठी जास्तीत जास्त देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम लागू करण्यात आले आहेत. पण आफ्रिकन देश युगांडामध्ये एक वेगळाच ट्रेन्ड बघायला मिळत आहे. (सांकेतिक छायाचित्र)2 / 10युगांडा आरोग्य मंत्रालयाने खुलासा केला आहे की, सरकारी क्वारंटाईनमध्ये राहणाऱ्या अनेक लोकांनी एकमेकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाच्या थैमानात मंत्रालयासाठी ही एक वेगळीच समस्या बनत आहे.3 / 10युगांडाचे आरोग्य मंत्रालयाचे सचिव डियाना अटविने यांनी रेडिओवर मुलाखतीत सांगितले की, त्यांना सर्वात जास्त या गोष्टीची चिंता आहे की, लोक असेच शारीरिक संबंध ठेवत राहिले तर कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरलं जाईल.4 / 10ते म्हणाले की, लोक क्वारंटाईन सेंटरमध्ये भेटत असलेल्या लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवत आहेत. ते एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये जात आहेत. याने कोरोना व्हायरसचं संक्रमण आणखी पसरेल. (सांकेतिक छायाचित्र)5 / 10ते म्हणाले की, युगांडाचे नागरिक कोरोना व्हायरसच्या धोक्याबाबत अजूनही गंभीर नाहीत. क्वारंटाईनमध्ये राहणाऱ्या काही लोकांचं सेक्शुअल अफेअर सुरू आहेत. ते नियम मोडून एकमेकांच्या रूममध्ये जात आहेत. 6 / 10अनोळखी लोकांसोबत अफेअर करण्यासोबतच काही लोक त्यांच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये इकडून तिकडे फिरत आहेत. ही फारच गंभीर बाब असून याने आमच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरलं जाणार आहे.7 / 10तसेच ते म्हणाले की, 14 दिवस उलटून गेल्यावरही काही लोकांना क्वारंटाईनमधेच ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे आता लोकांचं फिरणं बंद करण्यासाठी आणि त्यांच्यात सोशल डिस्टंसिंग राहण्यासाठी अधिक सुरक्षा अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.8 / 10मार्च महिन्यात आरोग्य मंत्रालयाने 17 जागांवर आयसोलेशन सेंटर तयार केले आहेत. तर कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी कंपला आणि एनतेबेमध्ये 17 क्वारंटाईन सेंटर तयार केले आहेत. ज्यात सामाजिक दर्जा न बघता सर्वांची सुरक्षा निश्चित केली जाईल.9 / 10हॉटेल्स, हॉस्पिटल्स, लॉज आणि युनिव्हर्सिटीमध्ये तयार केलेले आयसोलेशन सेंटरमध्ये 232 पेक्षा जास्त लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. 10 / 10युगांडामध्ये सध्या कोरोना व्हायरसचे 54 केसेस समोर आल्या आहेत तर 7 लोक बरे झाले आहे. सुदैवाने इथे अजून कोरोनामुळे कुणाचा मृत्यू झालेला नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications