Coronavirus : What is surgical mask history and How mask is safe for our health api
Coronavirus : आपला जीव वाचवणाऱ्या मास्कचा वापर कधी सुरू झाला होता? जाणून घ्या इतिहास... By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 11:51 AM1 / 10साधारणपणे लोक मास्कचा वापर तेव्हाच करतात जेव्हा त्यांना प्रदूषणापासून बचाव करायचा असतो. याचंही प्रमाण फार कमी आहे. पण आता स्थिती अशी आली आहे की, आपला जीव वाचवण्यासाठी मास्क गरजेचा झालाय. कोरोना व्हायरस जगभरात थैमान घालत आहे. अशात सर्वच देशांनी लोकांना काही अटींसोबत मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.2 / 10लोकही मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करू लागले आहेत. इतका की, आता मास्कचा तुटवडा जाणवत आहे. मास्क आता घराघरात दिसू लागला आहे. 3 / 10म्हणजे मास्क अच्छे दिन आले आहेत. पण मास्क तयार कधी आणि कसा तयार केला गेला किंवा आजारांपासून मास्कचा वापर कधीपासून होतोय हे तुम्हाला माहीत नसेल.4 / 10साधारण दोन दशकांआधी 1897 मध्ये फेस मास्क वापरण्याची सुरूवात पॅरिसमध्ये झाली होती. फ्रेंच सर्जन पॉल बर्जर यांनी एक सर्जरी करताना मास्कचा वापर केला होता. 5 / 101918 पर्यंत सगळ्या लोकांना स्वत:ला वाचवण्यासाठी सर्जिकल मास्कचा वापर करायचा होता. पहिल्या महायुद्धात मास्क लोकांची काळजी घेण्याचं प्रतिक बनला. 6 / 10नंतर 1910 मध्ये मास्क चीनमध्ये एक सुरक्षित वस्तू बनला आणि लवकरच चिकित्सा विश्वात मास्क आधुनिकतेचं प्रतिक बनला. जसे की, न्यूमोनिया, प्लेग पसरला तेव्हा मास्ककडे प्राथमिकता म्हणून पाहिलं गेलं.7 / 10चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या आरोग्य अभियानांमध्ये मास्कचा वापर झाला. त्यानंतर 2002 मध्ये जगभरात पसरत असलेल्या SARS च्या महामारीला रोखण्यासाठी मास्कचा वापर झाला. 8 / 10पुढे 2014 मध्ये सर्जिकल मास्क चायना फॅशन वीकमध्ये पोहोचला. नंतर 2015 मध्ये डिजायनर मॅश मा ने मास्क पॅरिसच्या रॅम्पवर पोहोचवला. अशाप्रकारे मास्क लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी एक चांगला पर्याय बनला. 9 / 10हेच कारण आहे की, डॉक्टर लोकांना संक्रमणापासून बचावासाठी मास्कचा वापर करण्याचा सल्ला देतात. कोरोनालाही हरवण्यासाठी मास्कचा वापर लोक करत आहेत. 10 / 10एका रिसर्चनुसार, आपण सगळेच दिवसातून किमान 16 वेळा आपल्या चेहऱ्याला स्पर्श करतो. ज्यामुळे अनेक बॅक्टेरिया तोंडावाटे आपल्या शरीरात जातात. अशात मास्कचा वापर केला तर आपण चेहऱ्याला हात लावत नाही. म्हणजे तोंड झाकलेलं असल्याने संक्रमणही होत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications