शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातील 'या' पाच देशांमध्ये सर्वाधिक शाकाहारी लोक राहतात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 10:11 AM

1 / 6
भारतातील अनेकांना शाकाहारी पदार्थ खायला आवडतात. मात्र, जगभरातील अनेक देशांमध्ये मांसाहाराला खूप पसंती दिली जाते. दरम्यान, जे लोक मांस किंवा मांसाहारी अन्नापासून लांब राहतात, त्यांना शाकाहारी म्हणतात. त्यामुळं अशा देशांबद्दल जाणून घेऊया की, जिथे सर्वाधिक शाकाहारी लोक राहतात.
2 / 6
वर्ल्ड ॲटलसच्या मते, भारतात शाकाहाराचा दर जगात सर्वाधिक आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, भारताची ३८ टक्के लोकसंख्या शाकाहारी आहे. देशातील मांसाहारी दर देखील जगातील सर्वात कमी आहे. भारतात १८ टक्के लोक निवडक मांस खाणारे तर ९ टक्के शाकाहारी आणि ८ टक्के लोक पेस्केटेरियन आहेत. शाकाहाराचा इतिहास २३०० ईसापूर्व भारतात हिंदू धर्माच्या स्थापनेशी जोडलेला आहे. भारतातील राजस्थान (७४.९ टक्के), हरियाणा (६९.२५ टक्के), पंजाब (६६.७५ टक्के) आणि गुजरात (६०.९५ टक्के) या राज्यांमध्ये सर्वाधिक शाकाहारी लोक आढळतात.
3 / 6
२०२३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड ॲटलस अहवालानुसार, मेक्सिकोची १९ टक्के लोकसंख्या शाकाहारी आहे, ज्यामुळे हा जगातील सर्वाधिक शाकाहारी लोकांचा दुसरा देश बनला आहे. मेक्सिकोमध्ये १५ टक्के पेस्केटेरियन आणि ९ टक्के शाकाहारी आहेत. मेक्सिकन पाककृती शाकाहारी घटकांवर आधारित आहे, त्यात बीन्स, स्क्वॅश, चॉकलेट, कॉर्न, कॅक्टस, शेंगदाणे, मिरची, चिया आणि राजगिरा यांचा समावेश आहे.
4 / 6
२०१२ मध्ये ब्राझीलची ८ टक्के लोकसंख्या शाकाहारी होती, ही संख्या १४ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. हा देश आपल्या वैविध्यपूर्ण शाकाहारी पाककृतीसाठी देखील ओळखला जातो, ज्यामध्ये चीज पफ, स्ट्यू आणि फळे आणि भाज्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश आहे. स्टॅटिस्टाच्या मते, ब्राझीलमध्ये सर्वात जास्त शाकाहारी लोक साओ पाउलोमध्ये राहतात, जिथे ११, १०० पेक्षा जास्त लोक राहतात. रिओ डी जनेरियोमध्ये शाकाहारी लोकांची दुसरी सर्वात मोठी लोकसंख्या आहे, जिथे ३,२०० पेक्षा जास्त शाकाहारी लोक राहतात.
5 / 6
३० लाखाहून अधिक तैवान लोक किंवा एकूण लोकसंख्येच्या १३ टक्के लोक शाकाहारी अन्न खातात. तैवानला आंतरराष्ट्रीय माध्यमांनी शाकाहारी लोकांसाठी अनुकूल वातावरण असल्याचे म्हटले आहे. तैवानमध्ये अंदाजे सहा हजार शाकाहारी रेस्टॉरंट्स आहेत आणि हाय स्पीड रेल्वे, तैवान रेल्वे प्रशासन, प्रमुख तैवान एअरलाइन्स आणि हायवे स्टॉपवर दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये शाकाहारी पदार्थ मिळू शकतात.
6 / 6
इस्रायलची सुमारे १३ टक्के लोकसंख्या शाकाहारी आहे, ज्यामध्ये ७.२ टक्के पुरुष आणि ९.८ टक्के महिलांचा समावेश आहे. इस्रायलमधील शाकाहाराचे श्रेय यहुदी धर्माला दिले जाते, कारण ते प्राणी खाण्यास मनाई करतात.
टॅग्स :vegetableभाज्याHealthआरोग्य