Couple promote farming before pre wedding photoshoot of couple in mud see pics
सुंदर कपलने चिखलात केलं प्री वेडिंग फोटोशूट, इंटरेस्टींग आहे कारण.... By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 9:25 AM1 / 9Pre Wedding Photoshoot viral photos: सोशल मीडियावर नेहमीच प्री वेडिंग फोटोशूटचे काही फोटो व्हायरल होत असतात. यातील काही फोटोशूट हे खरंच बघण्यासारखे तर काही फोटो हैराण करणारे असतात. सध्या एका कपलचं फोटोशूट फारच चर्चेत आलं आहे. त्यांनी चिखलात प्री वेडिंग फोटोशूट केलं. 2 / 9हे कपल फिलीपींसच्या ओरमोक शहरात राहणारं आहे. जॉनसी गुतिरेज आणि इमे बोरीनागा यांनी शेती-शेतकऱ्यांना प्रमोट करण्यासाठी हा निर्णय घेतला. दोघेही शेतकरी परिवारातील आहे. शेती करणं त्यांचं पॅशन आहे. त्यामुळे दोघांनी हे फोटोशूट करण्याचं ठरवलं. 3 / 9या कपलने सांगितलं की, ते शेतकरी परिवारातील आहेत. त्यांचा मूळ व्यवसाय शेतीच आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या नव्या आयुष्याची सुरूवात करण्यासाठी चिखलात अशाप्रकारे फोटोशूट करण्याचं ठरवलं.4 / 9हे फोटो 2021 मध्ये चार्ल्ससी विजुअल्स नावाच्या फेसबुक पोस्टवर शेअर करण्यात आले होते. तेव्हापासून हे फोटो खूप चर्चेत राहिले आणि आता पुन्हा हे फोटो व्हायरल झाले आहेत.5 / 924 वर्षीचा जॉनसी आणि 21 वर्षीय इमे यांनी हे प्री वेडिंग फोटोशूट यासाठी केलं कारण त्यांना ही थीम वेगळी आणि खास वाटली. या थीमच्या माध्यमातून त्यांना निसर्गाप्रति त्यांचं प्रेम आणि पॅशन दाखवायचं होतं. हे फोटोशूट त्यांच्या परिवाराच्या धानाच्या शेतात केलं.6 / 9 फिलीपिंसच्या एका सरकारी शाळेत टीचर असलेल्या इमेने सांगितलं की, 'मी शेतीला एक असा जॉब किंवा प्रोफेशनच्या स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, ज्याचं त्याना योग्य क्रेडिट दरवर्षी मिळालं पाहिजे. लोकांनी शेतकऱ्यांचे आभार मानले पाहिजे.7 / 9इमेने एका मुलाखतीत सांगितलं की, तिची ईच्छा आहे की, जगाने हे बघावं आणि त्यांना जाणीव व्हावी की, चिखलात चालणं आणि काम करणं किती अवघड आहे.8 / 9इमेने एका मुलाखतीत सांगितलं की, तिची ईच्छा आहे की, जगाने हे बघावं आणि त्यांना जाणीव व्हावी की, चिखलात चालणं आणि काम करणं किती अवघड आहे.9 / 9इमेने एका मुलाखतीत सांगितलं की, तिची ईच्छा आहे की, जगाने हे बघावं आणि त्यांना जाणीव व्हावी की, चिखलात चालणं आणि काम करणं किती अवघड आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications