Croatian town offers houses for less than a dollar for a reason no transport no convenience
'या' ठिकाणी केवळ १२ रूपयांमध्ये होतेय प्रशस्त घरांची विक्री; पाहा काय आहे कारण By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 5:53 PM1 / 10घर खरेदी करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. यासाठी अनेकजण आपल्या जीवनभराची कमाई त्यात घालतात. परंतु एक असा देश आहे ज्या ठिकाणी लोकं आपली सुंदर घरं विकण्याचे प्रयत्न करत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही घरं केवळ १६ सेंट म्हणजेच जवळपास १२ रूपयांना विकली जात आहेत. (फोटो सौजन्य - Reuters)2 / 10रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार क्रोएशियाच्या उत्तरेकडील भागात असलेल्या लेग्राज या शहरात लोकं १६ सेंटमध्ये आपली घरं विकण्यास असहाय्य झाले आहेत. वाहतूक आणि जाण्यायेण्यास होत असलेल्या त्रासानंतर लोकांनी आपली घरं रिकामी करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता प्रशासनानंच या घरांची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. (फोटो सौजन्य - Reuters)3 / 10नुकतीच या ठिकाणी असलेली १२ घरे रिकामी करण्यात आली. या घरांची किंमत १ कुना म्हणजेच जवळपास १२ रूपये इतकी लावण्यात आली. यापैकी आतापर्यंत १७ घरांची विक्री झाली आहे, अशी माहिती लेग्राडचे महापौर इवान साबोलिक यांनी दिली. सीमाभागात हे शहर असल्यानं या ठिकाणची लोकसंख्या सातत्यानं कमी होऊ लागली असल्याचंही त्यांनी नमूद केलं. हे शहर हंगेरीच्या सीमेनजीक आहे.4 / 10रिपोर्टनुसार या शहरात कोणत्याही व्यक्तीला घर खरेदी करायचं असेल तर स्थानिक प्रशासन त्याची मदत करेल. इतकंच नाही तर या ठिकाणी कोणी राहू इच्छित असेल तर कमीतकमी त्या व्यक्तीला १५ वर्षे थांबण्याचा करार करावा लागेल. (फोटो सौजन्य - Reuters)5 / 10एकेकाळी क्रोएशियामधील लेग्राड हे असं शहर होतं ज्या ठिकाणी देशाची सर्वाधिक लोकसंख्या होती. परंतु १०० वर्षांपूर्वी ऑस्ट्रो आणि हंगेरीयन साम्राज्या अस्तानंतर या ठिकाणी लोकसंख्या कमी होऊ लागली आहे. (फोटो सौजन्य - Reuters)6 / 10पर्यावरणाच्या दृष्टीनं हे शहर अतिशय उत्तम आहे. या शहराच्या चारही बाजूंना जंगल आहे. या शहरात सध्या २,२५० लोकं राहतात. काही वर्षांपूर्वी या ठिकाणी याच्या दुप्पट लोकं राहत होती. परंतु आता हळूहळू लोकं या ठिकाणाहून अन्य ठिकाणी जाऊ लागले आहेत. (फोटो सौजन्य - Reuters)7 / 10काही महिन्यांपूर्वी इटलीमधूनही अशीच एक घटना समोर आली होती. इटलीतील सिसली येथील एका छोट्या गावात लोकांनी ८६ रूपयांना आपल्या घरांची विक्री केली होती. (फोटो सौजन्य - Sicily Official)8 / 10छोट्या गावांमध्ये कमी होत असलेली लोकसंख्या हेच त्यामागीलही कारण होतं. त्यामुळेच या ठिकाणी अगदी कमी किंमतीत लोकं घरांची विक्री करत होते. (फोटो सौजन्य - Sicily Official)9 / 10इटलीतील सिसली (sicily) आयलॅन्डवर विकली जात आहेत. १४ व्या शतकात वसलेल्या या गावाचे रुपांतर आता अर्बन जंगलात झाले आहे.10 / 10येथील अधिकांश घरे मोडकळीस आली आहेत. यामुळेच येथील लोकं गाव सोडून शहरांत गेले आहेत. यामुळे येथील घरं रिकामी झाली. त्यामुळे आता स्थानिक प्रशासनानं ही घरं विकण्याचा निर्णय घेतला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications