गर्लफ्रेन्डला पळवण्यासाठी खोटा कर्फ्यू पास काढला, आजीचाही 'जीव' घेतला; अन्.... By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 3:31 PM
1 / 10 तरूणीला पळवण्यासाठी बनवला खोटा कर्फ्यू पास; आजीलाही 'मारलं', पण तिने वेळेवर दिला दगा! 2 / 10 लॉकडाऊनमध्ये आजीचं निधन झाल्याचं खोटं सांगत दोन तरूणांनी तरूणीला पळवून आणण्याचा प्लॅन केला होता. पोलिसांनी दोघांना पकडलं असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 / 10 मीडिया रिपोर्टनुसार, कुल्लू आणि सरकाघाटचे दोन तरूण मनालीमध्ये राहत होते. दोघांनी एका मुलीला पळवून आणण्यासाठी एसडीएम मनाली यांच्याकडून आजीचं निधन झाल्याचं खोटं कारण सांगत कर्फ्यू पास तयार करून घेतला. (सांकेतिक छायाचित्र) 4 / 10 हा कर्फ्यू पास मनाली ते सरकाघाट दरम्यानचा होता. पण त्यांची गाडी जंजेहलीसाठी पुढ गेली. पुढे पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला. (सांकेतिक छायाचित्र) 5 / 10 नंतर त्यांनी आजीचं निधन झाल्याचं खोटं कारण सांगितलं आणि बहिणीला आणायला जात असल्याचंही सांगितलं. 6 / 10 मात्र, पोलिसांना दोघांच्या बोलण्यावर संशय आला. पण त्या दोघांनी आणखी एक कारनामा केला. त्यांनी इथूनच थुनाग गावातील पोलिसांना फोन केला आणि बहिणीला घेऊन जाण्याची परवानगी मागितली. (Image Credit : freepik.com) 7 / 10 पोलिसांनी त्यांना परवानगी दिली सुद्धा. दरम्यान एका तरूणाने पोलिसांना वडिलांचा नंबर दिला. पण तो नंबर त्याच्याकडेच होता. तोच आवाज बदलून पोलिसांसोबत बोलत होता. पण यावर पोलिसांना संशय आला आणि या तरूणावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले. (सांकेतिक छायाचित्र) 8 / 10 दोघेही येथून जंजेहलीसाठी निघाले आणि तिथे रस्त्याच्या कडेला तरूणीची वाट बघत राहिले. पण ती तरूणी काही आली नाही. पोलिसही यांच्या मागे होते. अंधार झाल्यावर दोघेही घराकडे परच निघाले.(Image Credit : project4gallery.com) (सांकेतिक छायाचित्र) 9 / 10 अंधारात लाईट बंद करून गाडी चालवत होते. पुन्हा ते पोलीस नाक्यावर पोहोचले तर त्यांना पोलिसांनी विचारले की, तुमची बहीण कुठे आहे? आता त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. 10 / 10 दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि जंजेहली पोलीस स्टेशनला घेऊन गेले. इथे त्यांनी पोलिसांना सांगितले की, त्या तरूणीने त्यांना दगा दिलाय. पोलिसांनी दोघांवरही लॉकडाऊनचं उल्लंघन करण्याचा गुन्हा दाखल केलाय. आणखी वाचा