शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महाराष्ट्रातील 'असं' ठिकाण जिथं चारही दिशेने येणाऱ्या भारतीय रेल्वेचं क्रॉसिंग होतं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 1:34 PM

1 / 10
भारतात हजारो रेल्वे क्रॉसिंग आहेत. ट्रेनमधील प्रवासादरम्यान तुम्ही एक ट्रॅक दुसऱ्या ट्रॅकला जोडताना आणि एक ट्रॅक क्रॉस करतानाही पाहिले असेल. पण, एकाच ठिकाणी चार ट्रॅक क्रॉसिंग होत असतील आणि ती अशी जागा बहुतेक लोकांनी पाहिली नसेल कारण अशी क्रॉसिंग संपूर्ण भारतात फक्त एकाच ठिकाणी आहे.
2 / 10
हिऱ्याचा आकार देणारे हे रेल्वे क्रॉसिंग महाराष्ट्रात फक्त नागपूरमध्ये आहे. याला डायमंड क्रॉसिंग म्हणतात. चारही दिशांनी जात असूनही येथे नियोजनबद्ध क्रॉसिंग सिस्टम अवलंबली जाते. एका ठिकाणी उभे राहिल्यास चारही दिशांना ट्रॅक दिसतात आणि चारही बाजूंनी रेल्वे ये-जा करतात.
3 / 10
विशेष म्हणजे डायमंड क्रॉसिंग पाहण्यासाठी अनेक लोक येतात. डायमंड क्रॉसिंग २४ तास खुले असते. मात्र येथे सर्वसामान्यांना जास्त वेळ राहण्याची परवानगी नाही. सुरक्षेच्या दृष्टीने ट्रॅकजवळ उभं राहणं योग्य नाही, त्यामुळे रेल्वे याठिकाणी फार वेळ कोणालाही उभं राहू देत नाही. असे असले तरी डायमंड क्रॉसिंग पाहण्यासाठी देशाच्या विविध भागातून पर्यटक येथे येतात.
4 / 10
रेल्वे ट्रॅकच्या जाळ्यात एका रस्त्याच्या चौकासारखं क्रॉसिंग असतं. ज्याला डायमंड क्रॉसिंग किंवा चौक म्हटला जातो. या क्रॉसिंगच्या चार दिशांनी रेल्वे क्रॉस होते. डायमंड क्रॉसिंग रेल्वेसाठी त्याचप्रमाणे काम करतं ज्याप्रमाणे रस्त्यावर एक चौक किंवा ट्रॅफिक सिग्नलसारखं काम करतो.
5 / 10
नागपूरला ईस्टमध्ये गोंदियाहून एक ट्रॅक येतो, हावडा-राउकेला-रायपूर लाइन आहे. दुसरा ट्रॅक दिल्लीहून येतो. तेच साउथकडूनही एक ट्रॅक येतो आणि वेस्ट मुंबईहूनही एक ट्रॅक येतो. अशात याला डायमंड क्रॉसिंग म्हटलं जातं.
6 / 10
डायमंड क्रॉसिंग हे एक विशेष प्रकारचे क्रॉसिंग आहे जो केवळ विशेष परिस्थितीत तयार केला जातो. रेल्वे रुळांच्या जाळ्यातील हा एक असा केंद्रबिंदू आहे, जिथे चारही दिशांनी रेल्वे रुळ एकमेकांना क्रॉस करतात. हे पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र आहे.
7 / 10
एकदा बारकाईने पाहिल्यावर तुम्हीही डोकं खाजवत बसाल. कारण अशा परिस्थितीत अपघाताचा धोकाही जास्त असतो. पण सगळा खेळ टाईम मॅनेजमेंटचा आहे. यामुळे, गाड्या अशा प्रकारे चालवल्या जातात की त्या एकमेकांना न आदळता सुरक्षितपणे क्रॉस होतात.
8 / 10
भारताचे रेल्वेचे जाळे खूप मोठे आहे, तरीही डायमंड क्रॉसिंग फक्त नागपुरातच असल्याचं सांगितलं जाते. हे डायमंड क्रॉसिंग नागपुरातील संप्रीती नगर परिसरातील मोहन नगरमध्ये आहे. मात्र, यावरही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
9 / 10
अनेक रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, येथे फक्त तीन ट्रॅक आहेत, त्यामुळे याला डायमंड क्रॉसिंग म्हटले जात नाही. मात्र पूर्वेला गोंदियाहून हावडा-रौकेला-रायपूर मार्गावर एक ट्रॅक येतो. एक ट्रॅक दिल्लीहून येतो, जो उत्तरेकडून येतो. त्याच वेळी एक ट्रॅक दक्षिणेकडून येतो आणि एक ट्रॅक पश्चिम मुंबईतूनही येतो. म्हणून त्याला डायमंड क्रॉसिंग म्हणतात.
10 / 10
जेव्हा लोको पायलटला ट्रेनचा ट्रॅक बदलायचा असतो तेव्हा तो कंट्रोल रूमच्या कंट्रोल पॅनलमधून काम करतो. ट्रॅकवरील हे 2 स्विच ट्रेनची हालचाल उजवीकडे आणि डावीकडे वळवतात, ज्यामुळे ट्रॅक बदलतो. ट्रॅक बदलण्याचे काम प्रत्यक्षात रेल्वे स्थानकाजवळच आहे.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे