Divorce diaries couple story husband wife vasectomy
एक वर्षापासून प्रेग्नेंट होऊ शकत नव्हती महिला, पतीची चलाखी समजल्यावर घेतला घटस्फोट By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 4:53 PM1 / 10ऑस्ट्रेलियातील एका महिलेने रिलेशनशिप पोर्टलच्या 'द डिवोर्स डायरी' कॉलममध्ये तिला आलेला भयानक अनुभव शेअर केला. एश्ले नावाच्या महिलेची कहाणी खरंच हैराण करणारी आहे. एश्लेने सांगितलं की, तिला सुरूवातीपासूनच फिरण्याची आवड होती आणि तिला लग्न करायचं नव्हतं. पण ती ३० वर्षांची झाल्यावर मित्र-मैत्रिणींचे लग्न पाहून तिलाही वाटलं की, तिने लग्न करावं.2 / 10एश्लेने लिहिलं की, 'साधारण एक वर्षानंतर मॅथ्यू माझ्या आयुष्यात आला. आम्ही एकाच ऑफिसमध्ये होते. हळूहळू आमच्यात जवळिकता वाढली. आम्ही नेहमीच भेटत होतो. साधारण एक वर्ष डेट केल्यावर मॅथ्यूने मला प्रपोज केलं. मी फार आनंदी होते. आम्ही तीन तासांपर्यंत आपल्या भविष्याबाबत बोलत राहिलो. त्याने मला मुलांबाबत विचारलं तर त्यावर मी भविष्यात बघू असं बोलले. जर मुले झाली तर चांगलीच बाब आहे आणि झाली नाही तर मला काही फरक पडत नाही'.3 / 10'आम्ही लवकरच लग्न केलं आणि हळूहळू माझ्या वागण्यात अनेक प्रकारचे बदल आले. आमच्या लग्नाला चार वर्षे झाली होती आणि मित्रांच्या मुलांना बघू मलाही वाटत होतं की, प्रेग्नेन्सीसाठी प्रयत्न करू. मी मॅथ्यूला सांगितलं की, मला आता बाळ हवं आहे. पण लवकरच मला जाणीव झाली की, मी काहीतरी चुकीचं बोलले. कारण ते ऐकल्यावर मॅथ्यू नाराज झाला होता'.4 / 10'मॅथ्यू म्हणाला की, आपण आपलं आयुष्य मुलांशिवाय जगण्याचा निर्णय घेतला होता. पण मला चांगलं आठवतं की, मी लग्नाआधी त्याला कसलंही प्रॉमिस केलं नव्हतं. तो म्हणाला की, बाळ झाल्यावर आपण फिरू शकणार नाही. काही दिवस आमचा यावरून वाद सुरू होता. मग दिवस मॅथ्यू म्हणाला की, तोही यासाठी तयार आहे आणि आपण बाळासाठी प्रयत्न सुरू केले पाहिजे. हे ऐकून मला आनंद झाला'.5 / 10'आमचे सुरूवातीचे सहा महिने चांगले गेले. पण त्यानंतर डॉक्टर आणि अपॉयमेंटचा सिलसिला काही थांबायचं नाव घेत नव्हता. बऱ्याच प्रयत्नांनंतरही मी प्रेग्नेंट होऊ शकत नव्हती. माझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते. माझी डॉक्टर म्हणाली होती की, कधी कधी प्रेग्नेसीला एक वर्षाचा वेळही लागू शकतो. त्यामुळे मी टेन्शन घेऊ नये. बघता बघता एक वर्ष निघून गेलं आणि मी प्रेग्नेंट नाही झाले'.6 / 10'अखेर माझ्या डॉक्टरने मॅथ्यूच्या काही टेस्ट करण्यास सांगितलं. मी त्याला अपॉयमेंट बुक करण्यास सांगितलं तर तो माझ्यावर वाईट प्रकारे भडकला. तो म्हणाला की, जर बाळ होतच नाहीये तर त्यासाठीचे प्रयत्न सोडले पाहिजे. यावरून आमच्यात फार भांडण झालं. आम्ही तीन आठवडे बोललो नाही. मग अचानक एका रात्री मॅथ्यूने जे सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमिनच सरकली'.7 / 10'मॅथ्यूने सांगितलं की, त्याचं आधीही एक लग्न झालं आहे. इतकंच नाही तर त्याच्या पहिल्या पत्नीला बाळ नको होतं आणि ती प्रेग्नेंट राहू नये म्हणून मॅथ्यूने नसबंदी करून घेतली होती. मला मझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. असं वाटत होतं की, मॅथ्यू दुसरीच कुठली भाषा बोलत आहे. हे त्याला चांगलं माहीत होतं की, त्याच्यामुळे मी प्रेग्नेंट राहू शकत नव्हते. तरी तो माझ्यासोबत खोटं बोलत राहिला'.8 / 10'मॅथ्यूने यामागे अनेक तर्क दिले की, ज्याप्रकारे मी अचानक बाळाची इच्छा व्यक्त केली. कदाचित त्याचप्रमाणे एखाद्या दिवशी अचानक मी म्हणेन मला बाळ नको आहे. कदाचित हे मी मान्य करावं की, बाळ माझ्या नशीबात नाही. मी हे ऐकून हैराण होते की, जी गोष्ट आधीच माहीत आहे, तिला भाग्याचं नाव कसं दिलं जाऊ शकतं'.9 / 10एश्लेने लिहिलं की, 'या घटनेला ६ महिने होऊन गेले आहे आणि मी अजूनही शॉकमद्ये आहे. मला असं वाटत आहे की, मी एखाद्या काल्पनिक कथेतून बाहेर आले आहे. मला लवकरात लवकर हे लग्न संपवायचं होतं. मी माझ्या वकिल बहिणीला घटस्फोटाची कागदपत्रे तयार करण्यास सांगितलं'.10 / 10एश्ले आता या धक्क्यातून बाहेर निघण्यासाठी थेरपिस्टची मदत घेत आहे. एश्लेने लिहिलं की, 'इतक्या मोठ्या दग्याला विसरणं सोपं नाही. मला छोट्या छोट्या गोष्टी आठवतात. प्रेग्नेंट होऊ न शकण्याला मी स्वत:ला जबाबदार धरत होते. मला वाटत होतं की, माझं शरीर मला साथ देत नाहीये. आता एश्लेची बहीण तिच्यासोबत राहण्यासाठी आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications