शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

...'इथं' आहे आशियातील सगळ्यात मोठी कुबेराची मुर्ती; धनत्रयोदशीला केली जाते पुजा; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 5:55 PM

1 / 6
आशियातील सगळ्यात मोठी कुबेराची मुर्ती विदिशा जिल्ह्यातील एका वस्तूसंग्रहालयात ठेवली आहे. ज्या ठिकाणी भगवान कुबेराची पुजा केली जाते. भगवान कुबेर स्वर्गातील धनाला देवता मानतात. असं मानलं जातं.या जिल्ह्यातील लोकांकडे धनाची कमतरता भासू नये यासाठी विदिशा येथिल लोक या संग्रहालयात मुर्तीची पूजा करतात.
2 / 6
२००५ पासून या ठिकाणी कुबेर देवाची पूजा केली जाते. जिल्हा संग्रहालयात असलेले कुबेराची ही मुर्ती आशियातील सगळ्यात मोठी मुर्ती मानली जाते. जगभरात कुबेराच्या चार सगळ्यात मोठ्या मुर्ती आहेत. ही मुर्ती आशियातील सगळ्यात मोठी मुर्ती आहे. असं मानलं जातं.
3 / 6
विदिशा ऐतिहासिक दृष्टीकोनातून सम्राट अशोकाचे सासर म्हणून ओळखले जाते. विदिशा या ठिकाणाचे सुरूवातीचे नाव भेलसा होते. सम्राट अशोकाने या ठिकाणच्या युवती देवीशी विवाह केला होता. याच कारणामुळे विदिशामध्ये वेळोवेळी पुरातन संपत्ती मिळत राहिली आहे. अनेकदा उत्खननातून विदिशातील पुरातन इतिहासाची प्रमाणं सापडली आहेत.
4 / 6
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार ही धन कुबेराची मुर्ती बेटवा नदीच्या घाटावर होती. शहरातील लोकांनी विशाल दगड समजून या दगडावर कपडे धुवायला सुरूवात केली होती. अनेक वर्षांपर्यंत या दगड समजून या मुर्तीवर कपडे धुण्याचे काम सुरू होते.
5 / 6
इतिहासकारांनी दिलेल्या माहितीनुसार या मुर्तीला जिल्हा संग्रहालयात सुरक्षित ठेवण्यात आले आहे. ही मुर्ती आज देशभरातील पर्यटकांचे आकर्षण बनली आहे.
6 / 6
धनत्रयोदशीला या मुर्तीची पूजा केली जाते. लोक या ठिकाणाला प्रदक्षिणा घालून मुर्तीचे पूजन करतात. (Image Credit- aajtak)
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेDiwaliदिवाळी