शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ratan Tata Education: रतन टाटांचे शिक्षण किती माहितीये? विद्यार्थी जीवनात केला मोठा संघर्ष, वेळेप्रसंगी धुणीभांडी; पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 12:58 PM

1 / 12
आताच्या घडीला जगभरात सर्वत्र बोलबाला आहे तो दिग्गज उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचाच. यामागे अनेक कारणे आहे. सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे ६८ वर्षांनी Air India ची टाटा समूहात झालेली घरवापसी आणि दुसरे म्हणजे TATA च्या अनेकविध कंपन्यांची सुरु असलेली यशस्वी घोडदौड.
2 / 12
रतन टाटा यांचा केवळ भारतात नाही, तर जगभरात दबदबा आहे. रतन टाटा यांनी अनेक रसातळाला गेलेल्या कंपन्यांना नवसंजीवनी दिल्याचे सांगितले जाते. रतन टाटा यांची जीवन प्रवास हा तितकाच रंजक आणि संघर्षमय आहे. टाटांसारख्या बड्या कुटुंबात जन्मलेल्या रतन टाटा यांना सर्व गोष्टी सहजरित्या मिळाल्या असे नाही. त्यासाठी त्यांनाही कष्ट करावे लागले.
3 / 12
रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी (Ratan Tata Birth Date) झाला. इयत्ता आठवीपर्यंत रतन टाटा यांनी मुंबईतील कॅम्पियन स्कूल येथे आपले शालेय शिक्षण घेतले. यानंतर कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल आणि शिमला येथील बिशप कॉटन स्कूल येथून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. (Ratan Tata Education)
4 / 12
यानंतर रतन टाटा परेदशात शिक्षणासाठी गेले. सन १९५५ मध्ये रतन टाटा यांनी न्यूयॉर्क सिटीमधील रिवरडेल कंट्री स्कूल येथून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तर १९५९ मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून आर्टिटेक्चरची पदवी घेतली. हार्वर्ड बिझनेस स्कूल येथून ७ आठवड्यांचा अॅडवान्स्ड मॅनेजमेंट प्रोग्राम पूर्ण केला. यानंतर रतन टाटा यांनी मागे वळून पाहिले नाही, असे सांगितले जाते. (Ratan Tata Career)
5 / 12
सुरुवातीच्या काळात अनुभव घेण्यासाठी रतन टाटा यांनी टाटा सन्समध्ये काम करायला सुरुवात केली. विद्यार्थी जीवनात रतन टाटा यांना विमान उडवण्याचा मोठा छंद होता. एकदा संधीही मिळाली होती. मात्र, त्यावेळेस पैसे नसल्यामुळे संधी साध्य करता येत नव्हती. विमान उडवता आले पाहिजे, यासाठीच्या शिक्षणासाठी रतन टाटा यांनी वेळेप्रसंगी धुणीभांडी करण्याचेही काम केले.
6 / 12
अमेरिकेतील आपल्या १० वर्षांच्या विद्यार्थी जीवनातील वास्तव्यात रतन टाटा यांनी अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्या. हॉटेल, रेस्टॉरंट यांसारख्या ठिकाणीही कामे केली. आज तेच रतन टाटा जगभरातील अनेक उद्योजकांपैकी आघाडीचे उद्योजक आहेत.
7 / 12
टाटा कंपनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करते. रतन टाटा यांची मेहनत आणि कठोर परिश्रम यामुळे टाटा यांचं नावलौकीक आहे. आज मेहनतीच्या जीवावरच टाटा यांच्या कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. रतन टाटा यांनी सर्वसामान्यांसाठी एक स्वप्न पाहिलं होतं. प्रत्येक माणसाला चारचाकीतून फिरता यावं यासाठी रतन टाटांनी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट नॅनो ही कार भारतात सर्वात स्वस्त कार बाजारात आणली.
8 / 12
अवघ्या १ लाखात ही कार लोकांना खरेदी करता आली. रतन टाटा यांच्याकडे कार आहेत तसं फाइट जेटही आहेत. त्यांच्याकडे पायलटचं लायसन्स आहे. एकेकाळी भारतीय एअर फोर्स ए-१६ फायटर जेट त्यांनी उडवलं आहे. रतन टाटा यांच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या ताफ्यात अनेक लग्झरी कार पाहायला मिळतील.
9 / 12
रतन टाटा यांना गाड्यांचा शौक आहे. त्यांच्याकडे जगुआर, मर्सिडीज एसएल ५००, फरारी कॅलिफोर्निया, लँड रोव्हर फ्रिलँडरसारख्या महागड्या गाड्या आहेत. रतन टाटा हे सोयीसुविधा युक्त असलेल्या बंगल्यात राहतात.
10 / 12
कुलाबाच्या समुद्रकिनारी त्यांचे घर आहे. ३ मजल्याची इमारत १३ हजार फूटाची आहे. यातील पहिल्या भागात सन डेक आणि लिविंग एरिया आहे. तर बाकीच्या भागात जीम, लायब्रेरी, स्विमिंग पूल आणि लाऊज आणि स्टडी रुम आहेत. रतन टाटा यांची एकूण संपत्ती पाहिली तर नेट वर्थ डॉटनुसार १ बिलियन डॉलर इतकी आहे.
11 / 12
आताच्या घडीला TATA ग्रुप अनेकविध क्षेत्रात दमदार कामगिरी करत आहे. TATA ग्रुपच्या अनेक कंपन्या भन्नाट रिटन्सही देत आहेत. तसेच टाटा आता नवनव्या क्षेत्रातही पदार्पण करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
12 / 12
TATA ग्रुप देशातील सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये TATA ग्रुपने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
टॅग्स :Ratan Tataरतन टाटाTataटाटाJara hatkeजरा हटके