शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Interesting Facts : समोरच्या व्यक्तीच्या नाकावर ठेवा लक्ष, लगेच कळेल खरा आहे की खोटा; १० अशा विचित्र गोष्टी....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 1:57 PM

1 / 11
जीवन फारच अजब आहे. मनुष्य आणि समाज यापेक्षा मोठं दुसरं कुठलं रहस्य नाही असं म्हणतात. कारण मनुष्यांना मनात काय असतं हे पकडणं सोपं नाही. मनुष्य कधी खोटं बोलतो आणि कधी खरं बोलतं हे पकडणं सरळ नसतं. पण हेही खरं आहे की, माणसाच्या काही सवयी त्याच्याबाबत सगळं काही सांगतात. काही स्वाभाविक क्रिया-प्रतिक्रिया आणि बॉडीची लक्षणे अशी असतात ज्या माणसाबाबत खूप काही सांगतात. या जगात अशाही अनेक गोष्टी आहेत ज्याबाबत तुम्हाला माहीत नसेल....
2 / 11
खोटं बोलताना नाक लाल होतं - कुणाचं खोटं पकडायचं असेल तर त्याच्या नाकावर लक्ष द्या. जर नाक लाल दिसलं तर ध्यानात की ती व्यक्ती खोटं बोलत आहे. यामागचं कारण खोटं बोलल्यावर ब्लडचा प्रवाह वेगाने होतो.
3 / 11
झोपेत ४० वेळा बाजू बदलतो - हे तुम्हाला माहीत पडू शकत नाही. कारण तुम्ही रात्रभर झोपेत या कडावरून त्या कडावर झोपत असता. असं चेक करायचं असेल तर रात्रभर कुणालातरी तुमच्या बाजूला बसवावं लागेल.
4 / 11
व्यक्तीची उंची वा शरीर वडिलांवर जातं आणि मेंदू आणि भावना आईवर जातात असं म्हणतात. ९० टक्के केसेसमध्येच असंच होत असल्याचं सांगितलं जातं. वेगवेगळ्या रिसर्चमधूनही हे समोर आलं आहे.
5 / 11
कम्प्युटरच्या की-बोर्डवर टॉयलेट सीटपेक्षा ६० पटीने जास्त कीटाणू असतात. हे कीटाणू इतके सूक्ष्म असतात की, आपल्याला दिसत नाहीत. त्यामुळे की-बोर्डचा वापर करत असाल तर स्वच्छही करा.
6 / 11
शिंकताना डोळे बंद का होतात? - जर तुम्हाला वाटत असेल की, हे खरं नाही तर एकदा ट्राय करून बघा. डोळे हे संवेदनशील अंग आहे. जसाही काही तीव्र आवाज येतो. डोळे बंद होतात.
7 / 11
जगातला पहिला सेल्फी घेण्यासाठी ३ मिनिटे लागली होती. हा सेल्फी १८७३ मध्ये रोबोर्ट कार्नेलिअस नावाच्या व्यक्तीने घेतली होती. आज तर एकापेक्षा एक मोबाइल आणि फीचर असलेले फोन आले आहेत. पण आधी असं नव्हतं.
8 / 11
पृथ्वीवर मनुष्यांइतकंच मुंग्यांचंही वजन - मनुष्य पृथ्वीच्या काही भागांमधेच राहतात. तेही पृथ्वीच्या वरच्या भागावर. पण मुंग्या पृथ्वीच्या वर आणि खाली, झाडांवर आणि दगडांखाली कुठेही राहतात.
9 / 11
मुलं बोलताना अधिक अडखळतात - हे वेगवेगळ्या रिसर्चमधून समोर आलं आहे की, मुली संवेदनशील असतात. त्या बोलताना संयम ठेवतात तर मुलं ठेवत नाहीत. स्पीडमध्ये बोलल्याने मुलं अधिक अडखळतात.
10 / 11
एक व्यक्ती सरासरी रोज दहा वेळा हसते - तशी ही चांगलीच बाब आहे. एक सामान्य व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींवर हसतो. जे कमी हसतात ते दिवसातून १० वेळा तर नक्कीच हसतात.
11 / 11
डोळ्याखालील डार्क सर्कल सांगतात व्यक्ती दु:खी आहे - हे खरं आहे. जेव्हा तुम्ही चिंतेत असता, तेव्हा टेंशनमुळे झोप पूर्ण होत नाही. याने डोळ्यांवर दबाव पडतो.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके