Donald Trump's air force one aircraft safety features has protection against emp
एअरफोर्स वन : ट्रम्प यांचं फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षाही भारी विमान, याच्या भन्नाट गोष्टी वाचून व्हाल हैराण! By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 11:25 AM1 / 13अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले असून त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा सोशल मीडियात होत आहे. आधी त्यांच्या द बीस्ट कारची आणि आता ते ज्या बोइंग ७४७-२००बी सीरीजच्या विमानाने येत आहेत त्याची चर्चा होत आहे. चला जाणून घेऊ या विमानाची खासियत. (Image Credit : inforum.com) 2 / 13डोनाल्ड ट्रम्प यांचं हे खास विमान काही मिनिटांच्या नोटीसवर उड्डाण घेण्यास तयार असतं. इतकेच नाही तर विमानात राहूनही डोनाल्ड ट्रम्प हे कुणासोबतही कॉन्टॅक्टमध्ये राहू शकतात आणि अमेरिकेवर हल्ला होण्याच्या स्थितीत या विमानाचा वापर मोबाइल कमांड सेंटर म्हणूनही वापर केला जाऊ शकतो.3 / 13ट्रम्प यांचं हे एअरफोर्स विमान कधीही एकटं उडत नाही. काही कारगो विमान या विमानाच्या मागे-पुढे असतात. हे कारगो विमान डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तैनात असतात.4 / 13जगातल्या सर्वात शक्तीशाली देशाच्या राष्ट्राध्यक्षांचं हे विमान इतकं खास आहे की, वेळ पडली तर इंधन भरण्यासाठी हे विमान जमिनीवर उतरवण्याची गरज नाही. हवेत असतानाच या विमानात इंधन भरलं जाऊ शकतं.5 / 13एअरफोर्स वन हे विमान फार आधुनिक असून सुरक्षित कम्युनिकेशनच्या अनेक यंत्रणा यात आहेत. यातील ज्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्यांवर कोणत्याही इलेक्ट्रो मॅग्नेटिक पल्सचा प्रभाव होत नाही. इएमपी म्हणजे इलेक्ट्रो मॅग्नेटिक एक अशी पॉवर असते ज्याचा वापर करून आजूबाजूच्या सर्वच इलेक्ट्रॉनिक वस्तू काम करणं बंद करता येतात.6 / 13या विमानात एक मेडिकल सुईट सुद्धा असतं. जे एका ऑपरेशन रूम थिएटरसारखं काम करू शकतं. एका डॉक्टर ट्रम्प यांच्यासोबत विमानात असतो. जेणेकरून कोणत्याही परिस्थितीचा सामना करता यावा.7 / 13ट्रम्प यांच्या या विमानात ४ हजार वर्ग फूट इतकी जागा आहे आणि यात तीन लेव्हल म्हणजे तीन फ्लोर आहेत. ट्रम्प यांच्यासाठी खास रूमची व्यवस्था आहे. ऑफिस आणि एक कॉन्फरन्स रूमही यात आहे. तसेच यात जेवणासाठी १०० लोक एकत्र बसू शकतील इतकी जागा आहे. 8 / 13यात ट्रम्प यांच्यासोबत आणखीही काही महत्वाच्या लोकांच्या राहण्याची व्यवस्था असते. ज्यात सीनिअर अॅडव्हरटायसर, सिक्रेट सर्व्हिसचे ऑफिसर, मीडिया लोक आणि इतर काही पाहुण्यांचा समावेश असतो. हे विमान एका वेळी १०२ लोकांना घेऊन जाऊ शतं. ज्यात २६ क्रू मेंबर्सही समावेश आहे.9 / 13या विमानात एक खास रूम असते. या रूममध्ये ५० इंचाचा एक प्लाजा टीव्ही आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी सुविधा असतात. या रूममधून राष्ट्राध्यक्ष देशाला संबोधित करू शकतात.10 / 13भलेही राष्ट्राध्यक्ष हवेत असतील पण ते या विमानातून व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्कात राहतात. यासाठी इथे एका रूमध्ये १९ टीव्ही स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. (Image Credit : militarymachine.com)11 / 13एअरफोर्स वन हे विमान ३५ हजार फूट उंचीवर १,०१३ किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने उड्डाण घेऊ शकतं. एकावेळी हे विमान ६ हजार ८०० मैलाचा प्रवास करू शकतं. आश्चर्याची बाब या विमानाच्या उड्डानादरम्यान प्रतितास १,८१,००० डॉलक म्हणजे १ कोटी ३० लाख रूपये इतका खर्च येतो.12 / 13या विमानाच्या पायलटचा ग्रुप हा २६ लोकांचा असतो. यात २ पायलट, फ्लाइट इंजिनिअर, नॅव्हिगेटर, आणि इतर लोक असतात. विमानात ७६ लोक प्रवास करू शकतात. या विमानाची लांबी २३१ फूट ५ इंच असते. तर याचे विंग्स १९५ फूट ८ इंचाचे आहेत. विमानाची उंची ६३ फूट ५ इंच आहे. 13 / 13एअरफोर्स वनच्या देखरेखीची जबाबदारी प्रेसिडेंशिअल एअरलिफ्ट ग्रुपची असते. हा ग्रुप व्हाईट हाऊस मिलिटरी ऑफिसचा भाग असतो. हा ग्रुप १९४४ मध्ये तत्काली राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन रूझवेल्ट यांच्या आदेशावरून तयार करण्यात आला होता. (Image Credit ; csmonitor.com) आणखी वाचा Subscribe to Notifications