Egyptian mummy was a pregnant woman
आश्चर्य! पुरूष पुजाऱ्याची समजली जाणारी ममी निघाली गर्भवती महिलेची ममी, पोटातील भ्रूणही सुरक्षित स्थितीत By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 4:19 PM1 / 10वैज्ञानिक ज्या ममीला इतके वर्ष पुजाऱ्याची ममी समजत होते ती एका गर्भवती महिलेची ममी निघाली. ही जगातली पहिली अशी घटना आहे ज्यात गर्भवती महिलेची प्राचीन ममी इतक्या सुरक्षित स्थितीत सापडली. अनेक टेस्ट केल्यावर वैज्ञानिकांच्या हे लक्षात आलं की, ही पुरूषाची नाही तर गर्भवती महिलेची ममी आहे. 2 / 10पोलॅंडचे वैज्ञानिक मारजेना ओजारेक जिल्के यांनी सांगितले की, ही जगातली पहिली अशी केस आहे ज्या एखाद्या गर्भवती महिलेची ममी इतक्या सुरक्षित स्थितीत सपडली. ही ममी वॉरसॉमध्ये १८२६ मध्ये आली होती. या ममीच्या बॉक्सवर पुजाऱ्याचं नाव लिहिलं होतं.3 / 10तेव्हा या ममीची टेस्ट केली गेली नव्हती. त्यामुळे असं मानलं जात आहे की, यात पुरूष पुजाऱ्याची ममी आहे. मारजेनाने सांगितले की, आम्ही एक्स-रे आणि कॉम्प्युटर टेस्ट करून हे जाणून घेतलं तेव्हा हैराण झालो. या ममीच्या शरीरावर पुरूषांसारखे अवयव नव्हते.4 / 10या ममीचे केस लांब होते आणि महिलांची छाती होती. त्यासोबतच या ममीच्या पोटात एक भ्रूणही होतं. आम्ही पोटात छोटे हात आणि पाय पाहिले. हा शोध आमच्यासाठी हैराण करणारा आणि आनंद देणारा होता. मारजेनाने सांगितले की, आम्हाला असं वाटतं की, ही गर्भवती महिला २० ते ३० वयाची असेल.5 / 10ममीच्या पोटातील भ्रूणाच्या डोक्याचा आकार दिसून येतो. ज्यावरून असं वाटतं की, हे भ्रूण २६ ते २८ आठवड्यांचं असेल. वॉरसॉ नॅशनल म्युझिअम येथील ममी प्रोजेक्टमध्ये या ममीची टेस्ट केली गेली. याचा रिपोर्ट जर्नल ऑफ आर्किओलॉजिकल सायन्समध्ये प्रकाशित झाला. 6 / 10पोलीस अकॅडमी ऑफ सायन्सेसचे वैज्ञानिक वेजिसयेक एसमंड म्हणाले की, हा आमच्यासाठी फारच आश्चर्यजनक शोध आहे. आनंद देणारा शोध आहे. याने आम्ही प्राचीन काळातील गर्भावस्था, ट्रीटमेंट आणि महिलांची स्थिती याबाबत जाणून घेऊ शकतो. 7 / 10मारजेना म्हणाले की, या महिलेच्या योग्य वयाचा अंदाज लावण्याला वेळ लागेल. पण ही ममी बघून वाटतं की, ममी इसवीपू काळात बनवली गेली असेल. आम्ही प्रयत्न करत आहोत की, ममीची छेडछाड न करता जास्तीत जास्त खुलासे व्हावे.8 / 10मारजेना म्हणाले की, या महिलेच्या योग्य वयाचा अंदाज लावण्याला वेळ लागेल. पण ही ममी बघून वाटतं की, ममी इसवीपू काळात बनवली गेली असेल. आम्ही प्रयत्न करत आहोत की, ममीची छेडछाड न करता जास्तीत जास्त खुलासे व्हावे.9 / 10मारजेना म्हणाले की, या महिलेच्या योग्य वयाचा अंदाज लावण्याला वेळ लागेल. पण ही ममी बघून वाटतं की, ममी इसवीपू काळात बनवली गेली असेल. आम्ही प्रयत्न करत आहोत की, ममीची छेडछाड न करता जास्तीत जास्त खुलासे व्हावे.10 / 10मारजेना म्हणाले की, या महिलेच्या योग्य वयाचा अंदाज लावण्याला वेळ लागेल. पण ही ममी बघून वाटतं की, ममी इसवीपू काळात बनवली गेली असेल. आम्ही प्रयत्न करत आहोत की, ममीची छेडछाड न करता जास्तीत जास्त खुलासे व्हावे. आणखी वाचा Subscribe to Notifications