ही ८ वर्षाची मुलगी आहे शस्त्रात पारंगत, वडिल म्हणतात आम्हाला कसलीही भीती नाही... By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 6:45 PM
1 / 9 ही आहे 8 वर्षांची ऑटम फ्राई. रायफल, हँडगन आणि फ्लेम थ्रोअरसारखी शस्त्रं अगदी लिलया हाताळताना ती यूट्यूब चॅनेलवर दिसते. तिचे लाखो फॉलोअर्स आणि फॅन्स आहेत. 2 / 9 पेनसिल्वेनियात राहणाऱ्या फ्राई परिवारानं गेले काही दिवस गरिबीत काढले. आता मात्र त्यांच्याकडं शस्त्रांचा मोठा साठा जमला आहे. 3 / 9 लहानपणापासूनच या शस्त्रास्त्रांची सवय झाल्यामुळे ऑटमला त्यांची अजिबात भीती वाटत नाही. तिच्या या छंदामुळे तिचे 1 लाख 60 हजार सबस्क्रायबर्स झाले आहेत. 4 / 9 सामान्यतः पालक आपल्या मुलांना शस्त्रांपासून दूर ठेवताना दिसतात. मात्र ऑटमचा हा छंद तिच्या आईवडिलांनाना आवडत असून तिला ते प्रोत्साहन देत आहेत. 5 / 9 आपल्या मुलीला लहानपणापासूनच बंदूक आणि सुरक्षेबाबतचे धडे दिल्याचं तिचे वडील सांगतात. जेव्हा ती 7 वर्षांची होती, तेव्हापासूनच त्यांनी तिचे व्हिडिओ तयार करायला सुरुवात केली. यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. 6 / 9 जेव्हा मुलगी शस्त्र चालवते, तेव्हा तिच्याजवळ उभे राहून वडील तिचं निरीक्षण करतात. वेगवेगळ्या शस्त्रांची माहिती देणारे 77 व्हिडिओ तिनं आतापर्यंत तयार केले आहेत. 7 / 9 ऑटम अगदी आत्मविश्वासानं कानात हेडफोन घालत आणि सेफ्टी गॉगल लावत गन लोड करते आणि लक्ष्याचा वेध घेते. तिचे वडील तिला छोटी पिस्तुल देतानाही एका व्हिडिओत दिसतात. 8 / 9 अमेरिकेत शस्त्रास्त्रविरोधी कायद्याबाबत विचारलं असता, आपल्याला त्याची पर्वा नसल्याचं तिचे वडील सांगतात. आपल्या मुलीचं भवितव्य हे शस्त्रास्त्रांशीच संबंधित असेल, याची त्यांना खात्री आहे. 9 / 9 अमेरिकेत बंदुकांच्या बाबतीत अनेक अपघात आणि गुन्हे घडले आहेत. त्यामुळे लहान मुलं आणि बंदुका याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. आणखी वाचा