Elders want to become grandparents after son death asking sperm from widow daughter in law
सासू-सासऱ्यांनी सूनेकडे मागितले आपल्या मुलाचे स्पर्म, हैराण महिलेने सांगितली अडचण.. By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2021 4:18 PM1 / 9पतीच्या मृत्यूनंतर एक महिला फारच अडचणीत सापडली आहे. तिच्या सासू-सासऱ्यांची इच्छा आहे की, त्यांनी त्यांच्या दिवंगत मुलाच्या लेकरांना खेळवावं, यासाठी ते विधवा सूनेकडे फ्रीज केलेले मुलाचे स्पर्म मागत आहेत. पण महिला पतीचे स्पर्म देण्यास तयार नाही.2 / 9या महिलेने सोशल मीडियावर आपली अडचण शेअर करत सल्ला मागितला आहे. ज्यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोक महिलेच्या बाजूने आहेत तर काही लोक सासू-सासऱ्यांच्या बाजूने आहे.3 / 9प्रत्येक आजी-आजोबांची इच्छा असते की, त्यांनी नातवंडांना खेळवावं. त्यांच्यावर आपली संपत्ती-आनंद लुटवावा. पण त्याआधीच मुलाचा मृत्यू झाला. आता वयोवृद्ध आई-वडील विधवा सूनेकेड फ्रीज केलेले स्पर्म मागत आहेत. त्यांची इच्छा आहे की, त्यांचा मुलगा आता नाही तर त्यांचा वंश पुढे वाढवावा.4 / 9'मिरर'च्या एका रिपोर्टनुसार, विधवा महिलेने सोशल मीडिया साइट रेडिटवर आपली ही समस्या शेअर करत लिहिले की, तिला तिच्या दिवंगत पतीचे स्पर्म सासू-सासऱ्यांना देण्याची इच्छा नाही. 5 / 9तिने पुढे लिहिले की, 'जेव्हा माझ्या पतीला कॅन्सर असल्याचं समजलं तेव्हा आम्ही त्यांचे स्पर्म फ्रीज केले होते. जेणेकरून कीमोथेरपीनंतर आम्ही गर्भधारणा करून बाळांना जन्म देऊ शकू. पतीच्या उपचारादरम्यान सासू-सासरेही सोबत होते. सासू-सासऱ्यांना हे माहीत होतं की, आम्ही काय करतोय'.6 / 9महिलेने सांगितलं की, दुर्दैवाने पतीचा कॅन्सर बरा झाला नाही आणि १९ जुलै रोजी त्याचं निधन झालं. पतीच्या मृत्यूनंतर सासू-सासऱ्यांनी महिलेला विचारलं की, ती दिवंगत पतीच्या स्पर्मने गर्भधारणा करण्याची काही विचार करत आहे का? तर महिलेने नकार दिला.7 / 9यानंतर सासू-सासऱ्यांनी महिलेकडे दिवंगत पतीच्या स्पर्मची मागणी केली. जेणेकरून सेरोगसीच्या माध्यमातून ते आजी-आजोबा होऊ शकतील. पण त्यांच्या या डिमांडने महिला हैराण झाली आहे.8 / 9ती म्हणाली की, 'आम्ही स्पर्म फ्रीज केले होते. कारण आम्हाला आमचा परिवार एकत्र वाढवायचा होता. पण आता या डिमांडनंतर मी अडचणीत सापडले आहे की, सेरोगसीनंतर या बाळांचा सांभाल ते कसे करतील. कारण ते दोघेही ६० वयापेक्षा जास्त आहेत'.9 / 9महिलेकडून रेडिटवर शेअर करण्यात आलेल्या या पोस्टवर आतापर्यंत १६०० पेक्षा जास्त लोकांनी कमेंट केल्या आहेत. ज्यात अनेकजण महिलेच्या बाजूने आहे तर काही लोक सासू-सासऱ्यांच्या बाजूने आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications