Elephant call each other by name research claims
कमालच! हत्तीही एकमेकांना नावाने मारतात हाक, रिसर्चमधून खुलासा... By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 4:27 PM1 / 8Elephant : पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रजातीचे प्राणी असतात. प्राण्यांमध्ये हत्तीला सगळ्यात शक्तीशाली प्राणी मानलं जातं. हत्तींबाबत वेगवेगळ्या गोष्टी नेहमीच समोर येत असतात. मात्र, आता एक अशी माहिती समोर आली आहे जी वाचून तुम्ही अवाक् व्हाल. एका रिसर्चनुसार, हत्ती सुद्धा एकमेकांना नावाने हाक मारतात.2 / 8पृथ्वीवरील सगळ्याच प्राण्यांची खासियत असते. यात हत्तीबाबत समोर आलेली ही माहिती अवाक् करणारी आहे. हत्ती एकमेकांना नावाने हाक मारत असल्याचा दावा एका रिसर्चमधून करण्यात आला आहे. 3 / 8हत्तींवर झालेल्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, मनुष्यांप्रमाणे हत्तींना सुद्धा नावं असतात. या नावांचा वापर कळपातील सदस्य एकमेकांना संबोधित करण्यासाठी करतात. 4 / 8रिसर्चमधून समोर आलं आहे की, हत्ती सुद्धा आपल्या पिल्ल्यांची नावं ठेवतात. ते एकमेकांना हाक मारण्यासाठी या नावांचा वापर करतात. खास बाब ही आहे की, ही नावे मनुष्यांमध्ये ठेवल्या जाणाऱ्या नावांशी मिळती जुळती असतात. 5 / 8जंगली आफ्रिकी हत्तींबाबतचा हा रिसर्च नेचर इकोलॉजी अॅन्ड इव्होल्यूशन जर्नलमध्ये १० जून २०२४ ला प्रकाशित झाला होता. 6 / 8या रिसर्चनुसार, हत्ती कुणाची नक्कल न करता एकमेकांना हाक मारण्यासाठी व्यक्तिगत नावांचा वापर करतात. नावाने हाक मारल्यावर दुसरे हत्ती सुद्धा प्रतिक्रिया देतात.7 / 8हत्ती एकमेकांना हाक मारण्यासाठी एक खास प्रकारचा आवाज काढतात. हा आवाज तीन प्रकारचा असतो. पहिला आवाज कळपातून हरवलेल्या हत्तीला शोधण्यासाठी, दुसरा इतर सदस्यांच्या अभिवादनासाठी आणि तिसरा पिल्ल्यांची देखरेख करण्यासाठी काढला जातो. 8 / 8हत्ती आवाज तेव्हा काढतात जेव्हा त्यांना त्यांच्या साथीदारांना बोलवायचं असतं किंवा जो निघून गेलाय त्याला बोलवायचं असतं. तेच दुसऱ्या प्रकारचा आवाज अभिवादनाचा असतो. हत्तींकडून या आवाजाचा वापर तेव्हा केला जातो जेव्हा दुसरा हत्ती जवळ असतो. तर तिसरा आवाज हा पिल्ल्यांचा सांभाळ करण्यासंबंधी असतो. आणखी वाचा Subscribe to Notifications