Elon Musk lives in a luxury palace worth Rs 940 crore, not in a Rs 37 lakh container
37 लाखांच्या कंटेनरमध्ये नाही तर 940 कोटींच्या आलिशान राजवाड्यात राहतात एलोन मस्क By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 1:15 PM1 / 6 वॉशिंग्टन: TESLA आणि SpaceX कंपनीचे सीईओ एलोन मस्क (Elon Musk) यांचे खोटे उघडे पडले आहे. त्यांनी गेल्या वर्षी त्यांची सर्व घरे विकल्याची घोषणा केली होती. तसेच, ते गेल्या एक वर्षापासून स्पेसएक्सच्या आवारात एका कंटेनरमध्ये राहत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण, आता या सर्व बातम्या खोट्या असल्याची माहिती मिळत आहे. 2 / 6 वॉल स्ट्रीट जर्नलच्या मते, एलोन मस्क गेल्या वर्षभरापासून त्यांची गर्लफ्रेंड केन हॉवेरीसोबत ऑस्टिन, टेक्सास येथील $12 मिलीयन डॉलरच्या(940 कोटी) आलिशान राजवाड्यात गुप्तपणे राहत आहेत. त्यांनी दावा केला होता की, सर्व मालमत्ता विकल्यानंतर ते SpaceX लॉन्चिंग साइटवर $50,000(37 लाख) च्या एका कंटेनरमध्ये राहत आहेत.3 / 6मस्क यांनी स्वतःला बेघर म्हटले होते-लोन मस्क यांनी जूनमध्ये ट्विट केले होते की, माझे पहिले घर बोका चिका लॉन्च साइटवर आहे. मी 50 हजार डॉलर देऊन कंटेनरमध्ये बनलेल्या भाड्याच्या घरात राहत आहे. पण, वॉल स्ट्रीट जर्नलनुसार, एलोन मस्क गुप्तपणे आपला बहुतेक वेळ त्यांच्या मैत्रिणीच्या हवेलीत घालवत आहे. ही हवेली 8000 स्क्वेअर फूट परिसरात पसरलेली असून, जवळून कोलोरॅडो नदी वाहते. हवेलीमध्ये वॉटरफ्रंट पूल, जकूझी आणि खाजगी बोट क्लब देखील आहे.4 / 6हावेरीने केले वृत्तांचे खंडन-दरम्यान केन हावेरीने वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालाचे खंडन केले आहे. तसेच, एलोन मस्क तिच्यासोबत ऑस्टिनमधील राजवाड्यात राहत नाहीत, तर दक्षिण टेक्सासमध्येच स्पेसएक्सच्या आवारात राहात असल्याचे म्हटले आहे. ऑस्ट्रिया दौऱ्यात ते अधूनमधून माझ्या घरी पाहुणे म्हणून यायचे, असे तिने म्हटले आहे. 5 / 6ऑस्टिनच्या हवेलीची किंमत 2018 मध्ये $12 मिलीयन होती-रिअल इस्टेट सूत्रांनी सांगितले की, हवेली शेवटची 2018 मध्ये $12 दशलक्षमध्ये विकली गेली होती. ऑस्टिनमधले ते त्यावेळचे सर्वात महागडे कॉटेज होते. आता शहराच्या वेगाने वाढणाऱ्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये त्याची किंमत अनेक पटींनी वाढली आहे. एलोन मस्कने या हवेलीत राहण्यासाठी पैसे दिले आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.6 / 6एलोन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती-एलोन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती सुमारे 240 अब्ज डॉलर्स आहे. त्यातील बहुतांश भाग टेस्ला स्टॉक होल्डिंग्सच्या मालकीचा आहे. आतापर्यंत एलोन मस्कने टेस्लाचे 7.5 दशलक्ष शेअर्स विकले आहेत, ज्यातून त्यांनी $7.8 अब्ज कमावले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications