शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राजीनामा देताच कर्मचाऱ्याला मिळते पगारवाढ; कारण ऐकून तुम्हीही कंपनीचं कौतुक कराल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 10:52 AM

1 / 9
जेव्हा कुठल्या कंपनीचा कर्मचारी राजीनामा देतो आणि नोटीस पीरियडमध्ये काम करतो त्यावेळी कंपनीचा कर्मचाऱ्यासोबतचा व्यवहार बदललेला दिसतो. कंपनीचं पूर्ण लक्ष फूल एँन्ड फायनल सेटलमेंट करण्यावर असतं.
2 / 9
परंतु अशी एक कंपनी आहे जी कर्मचाऱ्याने राजीनामा दिल्यानंतर नोटीस पीरियड काळात संबंधित कर्मचाऱ्याचा पगार वाढवते. विश्वास बसत नाही ना...? नोकरी सोडल्यानंतर कर्मचाऱ्यांना ही अनोखी भेट देणारी पॉलिसी एका अमेरिकन मार्केटिंग एजेन्सीत लागू आहे.
3 / 9
या कंपनीचा उद्देश असा की, जो कर्मचारी राजीनामा देत असेल त्याला सोडून जाताना चांगला अनुभव यावा. जेणेकरून तो आनंदाने कंपनीचा निरोप घेईल. त्याच्या मनात कुठलीही खंत राहणार नाही. यासाठी कंपनी नोटीस पीरियडमध्ये सॅलरीत वाढ करते.
4 / 9
ही वाढ जवळपास १० टक्क्यांपर्यंत असते. कशी आहे ही पॉलिसी? हे जाणून घेऊया. ही पॉलिसी गोरिला नावाच्या मार्केटिंग एजन्सीमध्ये लागू आहे. कंपनीचे संस्थापक जॉन फ्रँको यांनी एका मुलाखतीत याबाबत सविस्तार माहिती दिली आहे
5 / 9
जॉन फ्रँको यांनी सांगितले की, एखाद्या कर्मचाऱ्याने आमची गोरिला फर्म सोडण्याचा निर्णय घेताच आणि कंपनीला याबाबत माहिती दिली की, त्याला वेगवेगळ्या मार्गाने समजावून थांबवण्याचा प्रयत्न केला जात नाही. तर किमान सहा आठवड्यांचा नोटीस पिरियड दिला जातो.
6 / 9
अशा कुठल्याही फुलटाइम जॉब करणाऱ्या कर्मचाऱ्याने राजीनामा दिल्यानंतर सुरुवातीला त्याला त्याच्या विद्यमान वेतनाच्या १०% पगारवाढ दिली जाते. मात्र या काळात आम्ही त्यांना वाढीव पगारासह तीन महिन्यांची नोटीस बजावण्यास सांगत आहोत असं कंपनीने म्हटलं.
7 / 9
तसेच असे करून आम्ही आमच्या कर्मचार्‍यांना वेगळेपणा देण्याचा प्रयत्न करतो. जेणेकरून त्यांना आपण चुकीच्या ठिकाणी आहोत असे अजिबात वाटू नये. याशिवाय या धोरणाच्या मदतीने पुढे जाण्यासाठी सज्ज होण्याची संधीही मिळते असं ते म्हणाले.
8 / 9
आमचे संपूर्ण लक्ष आम्हाला सोडून जाणार्‍या कर्मचार्‍याला अजिबात वाईट वाटू नये याकडे असते असंही Jon Franko यांनी म्हटलं. कर्मचारी राजीनामा देण्यासाठी आमच्याकडे आला आणि तीन महिन्यांत निघून जाईल असे सांगितले तर ही पॉलिसी लागू होते.
9 / 9
यानंतर कंपनी त्यांच्या पगारात १० टक्के वाढ करते. त्यासोबतच त्याच्या जागी काम करण्यासाठी योग्य उमेदवाराचा शोधही जलदगतीने करते. यावेळी त्याच्या जागी दुसरा कर्मचारी आल्यानंतर निघणारा कर्मचारीही आनंदाने निघून जातो. खरं तर, यामुळे हा बदल खूप सोपा झाला असं कंपनीचे संस्थापक जॉन फ्रॅन्को यांनी उदाहरण दिले
टॅग्स :jobनोकरी