Even a small rock sinks in a moment, but a large iceberg floats on the water, find out reason
छोटा खडासुद्धा एका क्षणात पाण्यात बुडतो पण मोठे हिमखंड पाण्यावर तरगंतात, जाणून घ्या कारण By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 3:02 PM1 / 6 प्रत्येकाने तलाव किंवा नदी दिसल्यावर कमीत-कमी एकदा खडे किंवा नाणी फेकली असतील. पण तुम्ही कधी विचार केला आहे की, पाण्यात टाकलेला एक छोटासा खडासुद्धा एका क्षणात बुडतो. 2 / 6 पण, पाण्याच्या ग्लासमध्ये टाकलेला बर्फाचा खडा किंवा मोठ-मोठे हिमखंड पाण्यावर तरगंत असतात. बर्फ पाण्यावर का तरंगतो, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ? आम्ही तुम्हाला याचं कारण सांगणार आहोत.3 / 6कोणतीही वस्तु पाण्यावर तरंगते किंवा बुडते. हे बुडणे किंवा तरंगणे त्या वस्तुच्या घनतेवर अवलंबून असतं. हा नियम आर्किमिडीजच्या सिंद्धांतावर कार्य करतो. 4 / 6 जर वस्तूची घनता त्याच्या व्यापलेल्या क्षेत्रापेक्षा जास्त असेल तर ती बुडेल आणि जर कमी असेल तर ती तरंगत राहील. भरीव वस्तूंची घनता जास्त असते, त्यामुळे ती बुडते आणि पोकळ वस्तुंची घनता कमी असल्यामुळे तरंगते.5 / 6 आधी सांगितल्याप्रमाणे जास्त घनता असलेली वस्तू बुडणार आणि कमी घनता असलेली वस्तू तरंगणार. पाण्याची घनता बर्फापेक्षा जास्त आहे, म्हणून जड बर्फ देखील पाण्याच्या पृष्ठभागावर सहजपणे तरंगतो. 6 / 6 बर्फाची घनता पाण्यापेक्षा 9 टक्के कमी आहे, यामुळेच बर्फ पाण्यावर तरंगतो आणि इतर जड बऱ्याच वस्तुंची घनता जास्त असल्यामुळे त्या वस्तू एका क्षणात पाण्यात बुडून जातात. आणखी वाचा Subscribe to Notifications