शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१५ ऑगस्टला भारताव्यतिरिक्त 'या' ५ देशात साजरा केला जातो स्वातंत्र्यदिन....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 5:34 PM

1 / 7
परवा संपूर्ण भारतभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जाईल. इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाल्यानंतर स्वातंत्र्य मिळून भारताला ७३ वर्ष पूर्ण होत आहेत. फक्त भारतातच नाही तर इतर ५ देशांमध्ये १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या देशात १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो.
2 / 7
भारताप्रमाणेच पाच देशांना १५ ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं होतं. उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, कांगो, बहरिन आणि लिकटेंस्टीन या देशांना १५ ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं.
3 / 7
दक्षिण कोरियाने १५ ऑगस्ट १९४५ जपानपासून आपले स्वातंत्र्य मिळवलं. सोवियत फोर्सेजनी जपानच्या ताब्यातून कोरियाला बाहेर काढलं. भारताप्रमाणे साऊथ कोरियातही या दिवशी नॅशलन हॉलिडे असतो.
4 / 7
दक्षिण कोरियाप्रमाणेच उत्तर कोरियातही १५ ऑगस्टला स्वातंत्र्य साजरा केला जातो. जपानच्या अधिपत्याखालून हे दोन्ही देश या दिवशीमुक्त झाले. सुट्टीचा दिवस असल्यामुळे याच दिवशी या देशात विवाहसोहळे संपन्न होतात.
5 / 7
१५ ऑगस्ट १९७१ रोजी बहरिन या देशाला स्वातंत्र्य मिळालं. ब्रिटीशांपासून बहरिनच्या नागरिकांनी स्वातंत्र्य मिळवलं होतं. बहरिनमध्ये नॅशलन हॉलिडे १६ डिसेंबरला साजरा केला जातो. बहरिनचा प्रमुख अल खलीफा यांनी या दिवशी सत्ता मिळवली होती.
6 / 7
कॉन्गो या देशानं १५ ऑगस्ट १९६० ला स्वातंत्र्य मिळवले. आफ्रिकेचा हा देश फ्रांसच्या चंगुलपासून स्वातंत्र्य झाला. त्यानंतर रिपब्लिक ऑफ कॉन्गोची निर्मीती झाली. १८८० पासून कॉन्गोवर फ्रान्सचा ताबा होता. लोकांमध्ये फ्रेंच कॉन्गो अशी ओळख आहे. १९०३ मध्ये मिडिल कॉन्गो निर्माण झालं.
7 / 7
लिकटेंस्टीन या देशाला १५ ऑग्स्ट १८६६ रोजी स्वातंत्र्य मिळाले. १९४० पासून १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. जगातील सगळ्यात लहान देशांपैकी एक लिकटेंस्टीन हा देश आहे.
टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनIndiaभारतSouth Koreaदक्षिण कोरियाnorth koreaउत्तर कोरिया