शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुमच्या पर्सनॅलिटीबाबत खूपकाही सांगतो तुमच्या डोळ्यांचा रंग, जाणून घ्या कसे आहात तुम्ही!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 11:30 AM

1 / 8
अनेकांना माहीत नसेल की, आपले डोळे आपल्या पर्सनॅलिटीबाबत खुलासा करतात. मनुष्यांच्या डोळ्यांच्या रंगावरून त्यांच्या पर्सनॅलिटीबाबत जाणून घेता येतं. 2007 मध्ये स्वीडनच्या Orebro विश्वविद्यालयातील वैज्ञानिकांनी 428 लोकांच्या डोळ्यांवर एक रिसर्च केला होता. या लोकांच्या डोळ्यांचे रंग वेगवेगळे होते. चला जाणून घेऊ या रिसर्चमधून समोर काय आलं.
2 / 8
काळे डोळे - काळ्या डोळ्यांचे लोक हे रहस्यमय असतात असा या रिसर्चमधून निष्कर्ष काढण्यात आला होता. या लोकांना पूर्वाभास जास्त होतो. हे लोक भरोशाचे असतात आणि गुपित गुपित ठेवण्यात तरबेज असतात.
3 / 8
भुरके डोळे - भुरक्या रंगाचे डोळे असलेले लोक हे जन्मताच लीडर असतात. या लोकांचं डोकं फार जास्त चालतं. ते स्वभावाने दृढनिश्चयी असता, पण कधी कधी दुसऱ्यांसमोर आपलं म्हणणं मांडण्यासाठी त्यांना समस्या येते.
4 / 8
डार्क ब्राउन - ज्या लोकांच्या डोळ्यांचा रंग डार्क ब्राउन असतो, असे लोक जास्त लोकांसोबत बोलणं पसंत करत नाहीत. काळ्या रंगाच्या डोळ्यांच्या लोकांप्रमाणेच हे लोकही रहस्यमय असतात.
5 / 8
निळ्या रंगाचे डोळे - निळ्या डोळ्यांचे लोक आतून खूप मजबूत असतात. अनेकदा लोक तुम्हाला चुकीचं जज करतात. एक तर तुम्ही फार घाबरट किंवा अहंकारी मानले जाता. पण या दोन्ही गोष्टी तुमच्यात नसतात. तुम्ही तुमच्या भावना जास्त व्यक्त करत नाहीत. तुम्ही शांतिपूर्ण, स्मार्ट आणि दयाळु लोकांमध्ये येता.
6 / 8
डार्क ब्लू डोळे - जर तुमचे डोळे डार्क ब्लू रंगाचे आहेत तर तुम्ही त्या लोकांपैकी आहात जे फार संवेदनशील असतात. तुम्ही शारीरिक रूपाने फार स्ट्रॉंग लोकांच्या यादीत येता.
7 / 8
ग्रे रंगाचे डोळे - रिसर्चमध्ये असं दिसून आलं की, ज्या लोकांचे डोळे ग्रे रंगाचे असतात, असे लोक दुसऱ्यांची फार चिंता करतात. या लोकांचं जीवन संतुलित असतं.
8 / 8
हिरवे डोळे - जर तुमच्या डोळ्यांचा रंग हिरवा असेल तर तुम्ही अशा लोकांपैकी आहात जे फार सतर्क राहतात. तुम्ही हुशारीने, जिज्ञासू वृत्तीने आणि जोशाने जीवन जगता.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेPersonalityव्यक्तिमत्व