शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

International Women's day: शुभेच्छा तर द्यालच पण माहित आहे का महिला दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 5:58 PM

1 / 11
आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women’s Day 2022) दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. समाजातील महिलांच्या वाढत्या भूमिकेचा उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
2 / 11
खरं तर या दिवसाच्या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी प्रात्यक्षिकांचे महत्त्व देखील आहे. यामुळेच महिलांना भेडसावणाऱ्या असमानतेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आंदोलनेही आयोजित केली जातात.
3 / 11
अधिकृतपणे, हा दिवस साजरा करण्याची सुरुवात १९७५ मध्ये झाली होती. परंतु, हा दिवस साजरा करण्याचा पाया १९०८ मध्ये न्यूयॉर्कमध्ये १५ हजार महिलांनी त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून रचला होता.
4 / 11
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात १५ हजार महिलांनी प्रथमच त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला होता. कामाचे तास कमी करावेत, चांगले वेतन मिळावे आणि मतदानाचा अधिकार मिळावा या मागणीसाठी हजारो महिलांनी आंदोलन केले.
5 / 11
या कामगार चळवळीतून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचा पाया रचला गेला असे म्हणता येईल. या चळवळीच्या एका वर्षानंतर, अमेरिकन सोशालिस्ट पार्टीने प्रथमच राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यास सुरुवात केली.
6 / 11
अमेरिकन सोशलिस्ट पार्टीने राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यास सुरुवात केल्यानंतर, हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याची कल्पना क्लारा झेटकिन नावाच्या महिलेला सुचली.
7 / 11
कोपनहेगन येथे झालेल्या वर्किंग वुमनच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत तिने ही कल्पना प्रथमच सर्वांसमोर ठेवली होती. या परिषदेत १७ देशांतील १०० हून अधिक महिला प्रतिनिधी सहभागी झाल्या होत्या.
8 / 11
कोपनहेगन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेनंतर १९११ मध्ये स्वित्झर्लंड, जर्मनी, डेन्मार्क आणि ऑस्ट्रियामध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला होता.
9 / 11
अधिकृतपणे हा दिवस साजरा करण्याची सुरुवात १९७५ मध्ये झाली जेव्हा संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. संयुक्त राष्ट्र संघाने १९९६ मध्ये प्रथमच थीम देऊन हा कार्यक्रम साजरा केला होता.
10 / 11
ज्या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो तो दिवस अनेक देशांमध्ये राष्ट्रीय सुट्टी असते. या देशांमध्ये रशियाचाही समावेश आहे.
11 / 11
रशियामध्ये (Russia) 8 मार्चच्या आसपास फुलांची विक्री दुप्पट होते. इटलीमध्ये मिमोसाची फुले देऊन हा खास दिवस साजरा केला जातो. अमेरिकेत या दिवशी राष्ट्रपती महिलांच्या कामगिरीचा गौरव करतात.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके