famous Hindu temples in Pakistan
पाकिस्तानतही आहे रामाचे मंदिर, जेथे लोक खुप गर्दी करतात; 'या' मंदिरात हिंदू-मुस्लीम ऐक्याचं दर्शन By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 6:23 PM1 / 10पंचमुखी हनुमान मंदिर, कराची: पाकिस्तानच्या कराचीमध्ये असलेल्या या अत्यंत प्राचीन मंदिराबद्दल असे मानले जाते की त्रेतायुगापासून म्हणजेच सुमारे 17 लाख वर्षांपासून पंचमुखी हनुमानाची मूर्ती येथे आहे.2 / 10जरी मंदिर 1882 मध्ये पुन्हा बांधले गेले. येथे हिंदू धार्मिक लोकांची गर्दी होत असते.3 / 10स्वामीनारायण मंदिर, कराची: कराची शहरातीलच बंदर रोडवर वसलेले हे मंदिर सुमारे 160 वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. येथे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माच्या लोकांची ये जा आहे.4 / 10असे म्हटले जाते की भारत-पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी मंदिराचा निर्वासित छावणी म्हणून वापर केला गेला. या मंदिराच्या आवारात एक गुरुद्वारा देखील आहे. येथून हिंगलाज भवानी शक्तीपीठाचा प्रवास सुरू होतो.5 / 10हिंगलाज शक्तीपीठ, बलुचिस्तान: हिंगलाज मंदिर हे सतीच्या 51 शक्तीपीठांपैकी एक आहे. हे मंदिर पाकिस्तानच्या बलुचिस्तानपासून 120 किमी अंतरावर हिंगोल नदीच्या काठावर आहे.6 / 10दुर्गा चालीसामध्येही या मंदिराचा उल्लेख आहे. असे म्हणतात की जेथे सतीचे भाग पडले तेथे शक्तीपीठाची स्थापना झाली. इथे सतीचे डोके येथे पडले होते असे सांगितले जाते. भारतासह अनेक देशांतून भाविक येथे येतात.7 / 10सूर्य मंदिर, मुल्तान: त्रेतायुगात भगवान रामाच्या सैन्यात असलेले जामवंत यांनी त्यांची मुलगी जमवंतीचा विवाह द्वापरयुगात भगवान श्रीकृष्णाशी केला.8 / 10 जामवंती आणि कृष्णाच्या मुलाचे नाव होते- सांबा. त्यांनी हे मंदिर बांधले होते. फोटोत हे मंदिर छान दिसत असले तरी त्याची अवस्था खूपच वाईट झाली आहे.9 / 10राम मंदिर, इस्लामकोट: पाकिस्तानातील इस्लामकोटमध्ये भगवान राम यांचे प्रसिद्ध मंदिर देखील आहे.10 / 10इस्लामकोटमध्ये मुस्लिमांप्रमाणे हिंदूंचीही मोठी लोकसंख्या आहे. येथील राम मंदिर हिंदू भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications