Fans rent cranes to watch race in Poland
आता बोला! बाइक रेस बघण्यासाठी चक्क क्रेन घेऊन आले लोक, सोशल डिस्टंसिंगची अनोखी आयडियाची कल्पना! By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 4:39 PM1 / 7सोशल डिस्टंसिंगसाठी लोक वेगवेगळ्या आयडियाच्या कल्पना लावताना दिसतात. अशीच एक भन्नाट आयडियाची चर्चा रंगली आहे. पोलॅंडच्या लब्लिन शहरात १३ हजार लोकांची क्षमता असलेल्या स्टेडिअममध्ये बाइक रेस पार पडली. 2 / 7मात्र, सोशल डिस्टंसिंगची काळजी घेत केवळ २५ टक्के सीटच बुक करण्यात आली होती. पण रेसिंगच्या चाहत्यांना तर ही रेस बघायची होतीच. त्यासाठी त्यांनी जी आयडिया लावली ती काबिले तारिफ आहे.3 / 7डेली मेलच्या वृत्तानुसार, रेस बघण्यासाठी चाहत्यांनी २१ क्रेन भाड्याने घेतले. प्रत्येक क्रेनवर काही लोक चढले आणि क्रेन वर नेण्यात आल्या. पूर्ण रेस संपेपर्यंत या रेस चाहत्यांनी रेसची मजा क्रेनवरूनच घेतली.4 / 7या क्रेन्स स्टेडिअमच्या चारही बाजूने उभ्या करण्यात आल्या होत्या. सोबतच काही क्रेन्स लॉबीमध्येही उभ्या केल्या होत्या. जेणेकरून प्रेक्षक साधारण ६५ फूट उंचीवरून मजा घेऊ शकतील.5 / 7आता अशी आशा केली जात आहे की, ऑगस्टमध्ये होणाऱ्या रेसमध्ये स्टेडिअमला ५० टक्के भरलं जाईल. आता लोकांकडून असा अंदाज लावला जात आहे की, पुढील रेसवेळी स्टेडिअमच्या चारही बाजूने केवळ क्रेनच क्रेन दिसतील.6 / 7प्रत्येक क्रेनवर २ ते ४ लोक उभे होते. रेस संपल्यावर त्यांनी क्रेनवरून आतषबाजीही केली. या सर्व क्रेन स्टेडिअमच्या फ्लड लाइट्सपर्यंत पोहोचल्या होत्या. रेस सुरू होण्याआधी केवळ तीन क्रेन बुक केले होते. नंतर ती संख्या वाढून २१ झाली होती.7 / 7प्रत्येक क्रेनवर २ ते ४ लोक उभे होते. रेस संपल्यावर त्यांनी क्रेनवरून आतषबाजीही केली. या सर्व क्रेन स्टेडिअमच्या फ्लड लाइट्सपर्यंत पोहोचल्या होत्या. रेस सुरू होण्याआधी केवळ तीन क्रेन बुक केले होते. नंतर ती संख्या वाढून २१ झाली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications