'Father of the Father of the Nation', the abandoned Idea of the farmer's father
'गरज ही शोधाची जननी', शेतकरी बापाची भन्नाट आयडिया By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 12:30 PM1 / 9इच्छा असेल तर मार्ग दिसेल, मराठीत अशी एक म्हण आहे. या म्हणीचा साक्षात्कार एका शेतकऱ्याने करून दाखवला आहे. 2 / 9शिक्षणाचा अधिकार प्रत्येकाला आहे, त्यासाठी सरकारने आठवीपर्यंत शिक्षण मोफत केले आहे. पण, तरीही इतर खर्च करणेही अनेकांना परवडत नाही. 3 / 9आर्थिक परिस्थिती बेतीचा असल्याने कम्बोडियातील एक शेतकरी आपल्या मुलास स्कुलबॅग घेऊन देऊ शकत नव्हता. तेव्हा, या शेतकऱ्याने मुलासाठी घरीच स्कुल बॅग बनवली. 4 / 9कंबोडियातील या 5 वर्षीय चिमुकल्याचं नाव नी केंग असे आहे. केंगची स्कुल बॅग पाहून शाळेतील शिक्षकही दंग झाले व त्यांनी इतर पालकांनाही ही बाब सांगितली. 5 / 9शेतकरी बापाने बनवलेली बॅग आपल्या खांद्यावर टाकून मुलगाही मोठ्या उत्साहात शाळेत गेला. शाळेतील शिक्षकांनी त्याचा फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड केला आहे. 6 / 9कंबोडियात एक साधारण स्कुल बॅग खरेदीसाठी किमान 7 डॉलर खर्च येतो. मात्र, एवढीही ऐपत नसल्याने मुलाच्या वडिलांनी घरीच ही स्कुल बॅग बनवल्याचे शिक्षकांनी सांगितले.7 / 9विशेष म्हणजे केंगच्या वडिलांनी केलेलं काम अनेक विदेशी व्यापाऱ्यांना आवडले असून त्यांनी चक्क केंगच्या वडिलांशी संपर्क केला. त्यामुळे आता केंगच्या वडिलांना नवा व्यवसाय मिळाला आहे. 8 / 9रफिया स्ट्रींगपासून हा सुंदर बॅग बनविण्यात आला आहे. एका वडिलाचं आपल्या मुलावरील प्रेम आणि शिक्षणाची तळमळ समाजाला दाखविण्यासाठी हा फोटो ट्विटरवर टाकल्याचं शाळेतील शिक्षकांनी सांगितले. 9 / 9गरज ही शोधाची जननी आहे, असेही आपण म्हणतो. पण, केंगच्या वडिलांनी या नव्या स्कुलबॅगचा शोध लावून त्याही म्हणीचा साक्षात्कार घडवला. आणखी वाचा Subscribe to Notifications