शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुलीसाठी स्वत: रूम सजवतो पिता, लग्नाआधी 10 मुलांसोबत राहते तरूणी; मग होते योग्य वराची निवड...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 2:30 PM

1 / 9
देश आणि जगात कोट्यावधी प्रकारचे समाज आणि संस्कृती आहेत. यातील अनेक गोष्टी पहिल्यांदा अजब वाटतात. पण त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांच्या संस्कृती चांगल्या आहेत. अशाच एका रिवाजाबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2 / 9
या संस्कृतीमध्ये एका मुलीच्या सुखी वैवाहिक जीवनाला फार महत्व देण्यात आलं आहे. या संस्कृतीमध्ये वडील जेव्हा आपल्या मुलीसाठी वर शोधतो तेव्हा मुलीची पसंत आणि तिची ईच्छा हे जास्त महत्वाचं असतं. मुलीच्या पसंतीला जास्त महत्व दिलं जातं. याचं कारण हे असतं की, जेव्हा मुलगी आपल्या पसंतीच्या मुलासोबत लग्न करेल तर ते लग्न यशस्वी होईल. याच कारणाने या समाजात 99 टक्के लग्नं यशस्वी आहेत.
3 / 9
हा समाज दक्षिण पूर्व आशियाई देश कंबोडियातील आहे. इथे मोठ्या संख्येने क्रेऊंग (Kreung) जमातीचे लोक राहतात. या जमातीतील संस्कृती खूप पुढचा विचार करते. यात मुलींना फार महत्व आहे. इथे मुलींच्या पसंतीला फार महत्व दिलं जातं. जेव्हा मुलगी मोठी होते तेव्हा वडील आपल्या हाताने मुलीसाठी 'लव्ह हट' तयार करतात.
4 / 9
लव्ह हट ची कल्पना एक असं घर आहे जिथे मुलगी आपल्या आई-वडिलांच्या नजरेपासून दूर स्वछंद वातावरणात जगू शकेल. इथे मुलगी एकटी राहते. इथे राहत असताना ज्या मुलांसोबत लग्नाची बोलणी सुरू असते ते एक-एक करून इथे येतात. मुलगा-मुलगी एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. सोबत राहत असताना ईच्छा असेल तर ते शारीरिक संबंधही ठेवू शकतात. हे सगळं तोपर्यंत चालू असतं जोपर्यंत मुलीला मनासारखा योग्य वर मिळत नाही.
5 / 9
इथे लव्ह हटची संकल्पना फारच महत्वाची आहे. या परंपरेचा उद्देश हाच आहे की, मुलीला खरं प्रेम मिळावं. लव्ह हट घरापासून दूर याच कारणाने बनवलं जातं की, मुलीवर त्यादरम्यान दबाव राहू नये. ती तिच्या ईच्छेने आवडत्या जोडीदाराला निवडू शकली पाहिजे.
6 / 9
या लव्ह हटबाबत आणखी एक खास बाब म्हणजे इथे जे तरूण येतात ते रात्रीच्या अंधारात घरात प्रवेश करतात आणि सकाळी निघून जातात. म्हणजे इथे दोघांच्याही नात्याबाबत गोपनियता पाळली जाते. याने भविष्यात वैवाहिक जीवनात काही समस्या येत नाही.
7 / 9
एका रिपोर्टनुसार, खऱ्या प्रेमाच्या शोधात तरूणी सामान्यपणे चार ते 10 तरूणांना लव्ह हटमध्ये बोलवतात. हे सगळे तरूण वेगवेगळ्या रात्री लव्ह हटमध्ये येतात. इथे महत्वाचा भाग हा आहे की, या भेटीदरम्यान तरूण-तरूणीने शारीरिक संबंध ठेवणं अनिवार्य नाहीये. हे त्यांच्या इच्छेवर अवलंबून असतं.
8 / 9
हे जरा अजब वाटेल पण हा समाज आधीपासून खूप आधुनिक विचार करणारा समाज आहे. लग्नासाठी मुलींच्या पसंतीला महत्व दिलं जातं. त्यामुळेच या समाजात लैंगिक हिंसा असा घटना फार कमी होतात.
9 / 9
कंबोडियामध्ये लैंगिक हिसेंच्या घटना फार कमी बघायला मिळतात. या समाजात बालपणापासूनच मुलांना मुलींचा सन्मान करणं शिकवलं जातं. जर इथे असं काही झालं तर त्या व्यक्तीला कठोर शिक्षा होते. मुलीने पसंतीचा वर निवडल्यावर जल्लोषात तिचं लग्न लावलं जातं.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेmarriageलग्न