शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आश्चर्यजनक! या झाडाला हात लावायला सुद्धा घाबरतात लोक; स्पर्श करताच जळतं संपूर्ण शरीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 4:10 PM

1 / 10
जगभरात कोरोना व्हायरसमुळे भीतीचं वातावरण तयार झालं आहे. पण ब्रिटनमध्ये कोरोना व्यतिरिक्त एका झाडाची जोरदार चर्चा होत आहे. या झाडाची दहशत पसरली आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण या झाडाला हात लावल्यामुळे शरीराला जळल्याप्रमाणे व्रण येतात.
2 / 10
इतकंच नाही तर या झाडाच्या संपर्कात आल्यामुळे डोळ्यांवरसुद्धा परिणाम होतो. साधारणपणे उन्हाळ्याच्या दिवसात हे झाडं ब्रिटनच्या वेगवेगळ्या भागात दिसून येतं. सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे वातावरणातील प्रदूषण कमी झालं आहे. म्हणून या झाडांची संख्या वाढली आहे.
3 / 10
या झाडाला जाइंट हॉगवीड (हेराक्लेम मेंटेगेजियम) नावाने ओळखलं जातं. दिसायला हे झाडं खूपचं सुंदर पांढरा रंग असलेल्या फुलांनी बहरलेलं दिसतं. हे झाडं पाहिल्यानंतर कोणालाही हात लावण्याचा मोह होईल. पण मोहात पडून स्पर्श करणं घातक ठरू शकतं.
4 / 10
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्याभरात लहान मुलांनी आणि मोठ्या माणसांनी सुद्धा या झाडाला स्पर्श केल्याच्या शेकडो घटना समोर आल्या आहेत. कारण दिसायला मनमोहक आणि सुंदर असल्यामुळे लोक या झाडाच्या फुलांना स्पर्श करायला जातात.
5 / 10
ब्रिटनमध्ये आढळून येत असलेल्या सर्वच झाडाझुडूपांमध्ये हे झाड सगळ्यात घातक आहे. या झाडाला स्पर्श केल्यानंतर या झाडातील घातक पदार्थ शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे त्वचेवर गंभीर परिणाम दिसून येतो.
6 / 10
ब्रिटनमध्ये आढळून येत असलेल्या सर्वच झाडाझुडूपांमध्ये हे झाड सगळ्यात घातक आहे. या झाडाला स्पर्श केल्यानंतर या झाडातील घातक पदार्थ शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे त्वचेवर गंभीर परिणाम दिसून येतो. या झाडामध्ये अनेक जीवघेणे केमिकल्स दिसून येतात. यांतील प्रमुख फोटोसेंसिटीसिंग फॉरनान्कोमेरियन हे केमिकल आहे. या केमिकल्सचा मानवी शरीराशी संपर्क होताच त्वचा जळते. त्यामुळे त्वचेच्या पेशींचं नुकसान होतं.
7 / 10
या झाडाच्या फुलाचा एखाद्या माणसांच्या डोळ्याशी संपर्क आल्यास दृष्टी सुद्धा जाण्याची शक्यता असते. या झाडाशी त्वचेचा संपर्क आल्यानंतर डॉक्टर शरीराच्या त्या भागाला नेहमी झाकून ठेवण्याचा सल्ला देतात. कारण सुर्याची किरण त्वचेच्या इन्फेक्टेड भागावर पडल्यास जास्त वेदना होण्याची शक्यता असते.
8 / 10
. रॉयल हॉर्टीकल्चर सोसायटीतील तज्ञांनी सांगितले की गेल्या काही दिवसात या झाडांची वाढ झालेली अनेक देशांमध्ये दिसून आली आहेत. लोकांना या झाडामुळे इजा पोहोचल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
9 / 10
(Image credit-Daily mail, Daily mirror, Daily express)
10 / 10
(Image credit-Daily mail, Daily mirror, Daily express)
टॅग्स :Jara hatkeजरा हटके