शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पावसाळ्यात येणाऱ्या कपड्यांच्या दुर्गंधीमुळे लाजिरवाणे वाटते? करा 'हे' सोपे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 4:46 PM

1 / 10
पावसाळ्यात दुर्गंधी येणारे कपडे बाहेर घालून जाणंही अशक्य असतं. दमट वातावरणात (Humid Environment) कपड्यांना लवकर वास येऊ लागतो.
2 / 10
अशा कपड्यांमध्ये बॅक्टेरियाही (Bacteria) वाढतो. त्यामुळे स्किन इनफेक्शनचा (Skin Infections) धोकाही वाढतो.
3 / 10
पावसाळ्यात कपडे लवकर वाळणे मुश्कील असते त्यामुळे अशावेळी कपडे धुतल्यानंतर मोकळ्या आणि हवेशीर जागेत वाळत घाला. पंख्याच्या हवेवरही तुम्ही कपडे सुकवू शकता. यामुळे कपड्यांना दुर्गंध येणार नाही.
4 / 10
अनेकदा पावसाळ्यात घरात एकप्रकारचं दमट वातावरण निर्माण होतं. त्यामुळे कपड्यांनाही एक वेगळाच वास यायला लागतो. अशावेळी धुतलेले कपडे कपाटात ठेवण्यापेक्षा मोकळ्या हवेत ठेवा.
5 / 10
पावसाळ्या उन कमी पडतं त्यामुळे सुकायला घातलेल्या कपड्यांचा वास यायला लागतो. अशात कपडे धुतल्यानंतर त्यातील पाणी चांगल्याप्रकारे पिळायला हवं.
6 / 10
दमट हवेने ओल्या कपड्यांना दुर्गंध येऊ लागते. अशा परिस्थितीत कपडे धुवताना लिंबाचा रस वापरा. यामुळे कपड्यांचा दुर्गंध निघून जाईल.
7 / 10
पावसात भिजलेले किंवा वापरलेले कपडे जास्त काळ ठेऊ नका. भिजलेले कपडे लगेच धुवून टाका.
8 / 10
धुतलेल्या कपड्यांमध्ये आताही वास येत असेल तर ते कपडे वापरण्याआधी एकदा इस्त्री करा किंवा रात्रीच त्या कपड्यांना इस्त्री करुन फॅनच्या हवेखाली ठेवा. इस्त्री केल्यामुळे कपड्यांचा वास पूर्णपणे निघून जातो.
9 / 10
कपडे सुकवण्यासाठी न्यूज पेपरचा वापर करा. हॅंगरला लटकवलेल्या कपड्यांखाली न्यूज पेपर ठेवा. पेपर पाणी शोषून घेतो.
10 / 10
बेकिंग सोडा वापरून पावसाळ्याच्या दिवसांत धुतलेल्या कपड्यांना येणारी दुर्गंध दूर करता येते. याकरता कपडे धुवताना डिटर्जंट बेकिंग सोडा किंवा व्हिनेगर वापरा. लगेचच फरक दिसेल.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके