female british singer brocarde married ghost now saying husband ruined honeymoon
अरेरे! लोकप्रिय सिंगरने 'भूता'शी केलं लग्न; आता म्हणते 'त्याने' हनीमून केला बर्बाद; पाहा बेडरुम फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 10:15 AM1 / 10आपल्यापैकी बहुतेकांनी लहानपणी खेडेगावात किंवा शहरांमध्ये भूताच्या लग्नाच्या हटके गोष्टी ऐकल्या असतील. पण एखाद्या स्त्री किंवा पुरुषाने भूताशी लग्न केल्याचं ऐकलं नसेल. मात्र आता अशीच एक विचित्र घटना ब्रिटनमधून ऐकायला मिळाली आहे. ब्रिटनची लोकप्रिय गायिका ब्रोकार्डे हिने हॅलोविनच्या निमित्ताने एका 'भूता'शी लग्न केलं आहे. 2 / 10ब्रोकार्डे हिच्या या अजब दाव्यामुळे सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. लग्न केल्यावर तिने आता आणखी एक दावा केला आहे. भूत असलेल्या आपल्या पतीन आपला हनीमूनच बर्बाद केल्याचं म्हटलं आहे. तिच्या लग्नाचे आणि बेडरूममधले काही भयंकर फोटो आता जोरदार व्हायरल होत आहेत. 3 / 10ऑक्सफर्डशायरमधील 38 वर्षीय गायिका आणि गीतकार ब्रोकार्डे हिने दावा केला आहे की, तिने लग्न केलेलं भूत हा व्हिक्टोरियन सैनिक आहे. या भूतप्रेमी एडवर्डोला गेल्या वर्षी भेटल्याचा दावा तिने केला होता. एडवर्डो गेल्या वर्षी अचानक तिच्या बेडरूममध्ये दिसला होता. यानंतर तो दररोज त्यांच्या बेडरूममध्ये येऊ लागला. 4 / 10ब्रोकार्डे दिलेल्या माहितीनुसार, तो एडवर्डोच्या प्रेमात कशी आणि कधी पडली हे तिला कळलंच नाही. ब्रोकार्डे म्हणते की, एडवर्डोच्या आधी तिचा भुतांवर अजिबातच विश्वास नव्हता. एडवर्डो आपल्या आयुष्यात आल्यापासून आता सर्वकाही पूर्णपणे बदलले आहे.5 / 10ब्रिटीश गायिका ब्रोकार्डेने खुलासा केला आहे की, तिचा व्हिक्टोरियन भूत पती एडवर्डो याने वेल्समध्ये त्यांच्या हनीमूनमध्ये खूप दारू प्यायली होती. डेलीस्टारच्या रिपोर्टनुसार, यानंतर एडवर्डोने तिला प्रत्येक गोष्टीसाठी पैसे देऊन तिचा मूड खराब केला.6 / 10ब्रोकार्डेने हॅलोविनच्या दिवशी लंडनमधील एसायलम चॅपलमध्ये एडवर्डोशी लग्न केले. ब्रोकार्डे म्हणाली की तिचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे एक चर्च शोधणे जे तिला त्रास न देता तिचं लग्न लावून देणं हे होतं.7 / 10तिच्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही असं सिंगरने म्हटलं. या विचित्र पद्धतीने त्यांचे लग्न लावण्यास कोणताही पादरी तयार नव्हता. तिला चर्चमधून हाकलून देण्यात आले. इतकंच नाही तर तिला भूत पळवण्याची धमकीही देण्यात आली होती.8 / 10ब्रोकार्डे हिने दिलेल्या माहितीनुसार, खूप प्रयत्न आणि अडचणींनंतर ती एसाइलम चॅपलमध्ये लग्न करू शकले. ब्रिटीश गायिक, लेखिक ब्रोकार्डे हिने तिच्या या लग्नाचे हटके फोटो आणि व्हिडिओ जारी केला आहे.9 / 10ब्रोकार्डेने हिने सांगितले की, जेव्हापासून एडवर्डो तिला तिच्या खोलीत रोज पाहू लागला, तेव्हापासून तिचे आयुष्य खूपच बदलले आहे. जीवन आणि भूतांबद्दलचा तिचा दृष्टीकोन बदलला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. (सर्व फोटो सौजन्य- फेसबुक/ब्रोकार्डे)10 / 10ब्रोकार्डेने हिने सांगितले की, जेव्हापासून एडवर्डो तिला तिच्या खोलीत रोज पाहू लागला, तेव्हापासून तिचे आयुष्य खूपच बदलले आहे. जीवन आणि भूतांबद्दलचा तिचा दृष्टीकोन बदलला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. (सर्व फोटो सौजन्य- फेसबुक/ब्रोकार्डे) आणखी वाचा Subscribe to Notifications