Female constable quarantine with lover as husband exposed in Nagpur
प्रेमासाठी कायपण! पती असल्याचं खोटं सांगत प्रियकरासोबत क्वारंटाइन झाली महिला कॉन्स्टेबल, अशी झाली पोलखोल! By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 9:55 AM1 / 9कोरोना व्हायरस आल्यापासून क्वारंटाइन सेंटर आणि हॉस्पिटलमधून अनेक विचित्र, आश्चर्यजनक घटना समोर येत असतात. कोरोनामुळे कुणाचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर उघड झालं तर कुणी पळून जाऊन लग्नं केलं. 2 / 9त्याची पत्नी थेट क्वारंटाइन सेंटरमध्ये पोहोचली. पण तिला आत जाऊ दिलं गेलं नाही. अखेर ती बजाज नगर पोलीस स्टेशनला पोहोचली आणि पती विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस आयुक्त डॉ.भूषण उपाध्याय यांनी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले.3 / 9ही घटना आहे बजाज नगर पोलीस स्टेशन परिसरातील. एका महिला कॉन्स्टेबलला तिच्या स्टाफमधील सहकारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवण्यात आले होते. 4 / 9महिला कॉन्स्टेबलने क्वारंटाइन सेंटरमध्ये सांगितले की, तिचा पती पोस्टल विभागात काम करतो, त्यालाही क्वारंटाइन केलं जावं.5 / 9पीटीआयच्या रिपोर्टनुसार, तिने तिच्या पतीच्या जागी आपल्या प्रियकराला आपल्यासोबत क्वारंटाइन करून घेतलं. तिचा हा प्रियकर विवाहित होता. जेव्हा तीन दिवसांपासून पती घरी आला नाही तेव्हा त्याच्या पत्नीला यबाबत माहिती मिळाली. (Image Credit : hurriyetdailynews.com)6 / 9त्याची पत्नी थेट क्वारंटाइन सेंटरमध्ये पोहोचली. पण तिला आत जाऊ दिलं गेलं नाही. अखेर ती बजाज नगर पोलीस स्टेशनला पोहोचली आणि पती विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस आयुक्त डॉ.भूषण उपाध्याय यांनी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले.7 / 9याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिला कॉन्स्टेबल अविवाहित आहे. आणि तिच्या सहकाऱ्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तिला क्वारंटाइन केलं गेलं होतं. यादरम्यान ती दुसऱ्या व्यक्तीसोबत क्वारंटाइन झाली.8 / 9नंतर समोर आलं की, महिलेने ज्या व्यक्तीला पती म्हणून समोर आणले होते तो तिचा प्रियकर आहे. तो पोस्टात नोकरीला आहे. हे प्रकरण उघड झाल्यावर दोघांना वेगळं करण्यात आलं. तिच्या प्रियकराला दुसऱ्या क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवण्यात आलं. 9 / 9ही महिला कॉन्स्टेबल आणि तिच्या प्रियकराची भेट गेल्यावर्षी ऑक्टोबमध्ये झाली होती. तेव्हापासून दोघेही एकमेकांच्या संपर्कात आहेत. दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. आणखी वाचा Subscribe to Notifications