शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ऐकावे ते नवलंच! ....म्हणून 'ही' डॉक्टर नेहमी बिकनी घालून करते रुग्णाचे उपचार, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 2:57 PM

1 / 7
डॉक्टरला देवाचा दर्जा दिला जातो. समाजात डॉक्टरला खूप मान सन्मान मिळत असतो. सध्या सोशल मीडियावर या डॉक्टरचा फोटो व्हायरल होत आहे. या डॉक्टरमुळे सोशल मीडियावर वाद विवाद होत आहेत. कारण डॉ. कँडिस मॅहरे यांनी इंस्ट्राग्रामवर बिकनीतील स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे.
2 / 7
कँडिस या समुद्र किनाऱ्या जवळ बेशुद्ध झालेल्या लोकाचे उपचार करतात. विशेष म्हणजे या डॉक्टर नेहमी बिकनीवरच असतात. समुद्र किनारी ड्यूटी असल्यामुळे या डॉक्टरला नेहमी बिकनीतच राहावं लागतं.
3 / 7
सोशल मीडियावर अनेकांनी या डॉक्टरला अनप्रोफेशनल म्हटलं आहे. तसंच वैद्यकिय क्षेत्राला बदनाम करण्याचे काम करत असल्याचा आरोप केला आहे.
4 / 7
डॉ. कँडिस यांनीही सगळ्यांना सडेतोड असं उत्तर दिलं आहे. या डॉक्टरचे सोशल मीडियावर 33 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्यांनी म्हटलं आहे की जेव्हा तुम्ही समुद्राच्या परिसरात संकटात सापडला त्यावेळी मी तुमचा जीव वाचवण्यासाठी उपस्थित असते. या पोस्टला सोशल मीडियावर 258,000 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.
5 / 7
हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर #MedBikini हा ट्रेंड होत आहे.
6 / 7
त्यांनी हा फोटो शेअर केल्यानंतर इतर डॉक्टरांनी सुद्धा बिकनीवरील फोटोज टाकायला सुरूवात केली आहे.
7 / 7
आपातकालीन स्थितीत लोकांचा जीव वाचवण्यासाठी डॉ. कँडिस प्रयत्नरत असतात. म्हणून त्यांना आपल्या कामाचा अभिमान वाटतो.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके