1 / 8वेगवेगळ्या खळबळजनक बातम्या मिळवण्यासाठी टीव्ही रिपोर्टर किती धडपड करतात हे नेहमीच बघायला मिळतं. मात्र एका रेडीओ रिपोर्टरचा एक कारनामा समोर आला आहे. डेन्मार्कच्या एका महिला पत्रकाराने एका व्यक्तीची मुलाखत तो शऱीरसंबंध ठेवत असताना घेतली. डेन्मार्कमध्ये पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टशी संबंधित चॅनल Radio4 वर ही मुलाखत प्रसारित करण्यात आली. डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, ही घटना एका अॅडल्ट क्लबमधील आहे. लॉकडाऊनमध्ये सूट मिळाल्यानंतर क्लब पुन्हा सुरू करण्यात आले आणि पत्रकार महिला तिथे रिपोर्टिंगसाठी गेली होती.2 / 8डेन्मार्क Radio4 ची महिला पत्रकार लुईश फिशरची ही मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यावर महिला रिपोर्टर म्हणाली की, मुलाखती दरम्यान शरीरसंबंध ठेवण्यावर संस्थेकडून त्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकण्यात आला नव्हता. 3 / 8लुईस फिशरने या वर्षाच्या सुरूवातीला डेन्मार्कची राजधानी कोपेरहेगनजवळ ईशोजमध्ये स्विंगलॅंडचा दौरा केला होता. महिला पत्रकार लॉकडाऊन उघडल्यानंतर सुरू झालेल्या अॅडल्ट क्लबवर रिपोर्ट तयार करत होती.4 / 8हा रिपोर्ट डेन्मार्कच्या Radio4 वर मार्चमध्ये सकाळी चार वाजता प्रसारित करण्यात आला होता. आता सोशल मीडियावर क्लीप व्हायरल झाल्यावर या घटनेची पुन्हा चर्चा होत आहे. 5 / 8रेडीओवर प्रसारित झालेला शोमधील काही भाग ट्विटरवर शेअर करण्यात आला होता. लुईश फिशरने सांगितलं की, ती क्लबच्या सदस्यांसोबत बसून वाईन घेत त्यांच्यासोबत बोलत होती. फिशर म्हणाली की, 'माझ्यासाठी हे फार स्वाभाविक होतं. एका अशा दुनियेबाबत लोकांना माहिती देणं ज्यापर्यंत लोक सहज पोहोचू शकत नाही'. 6 / 8लुईश म्हणाली की, ती सहज असल्याने लोकही तिला मुलाखत देण्यासाठी तयार झाले. हे लोक सुरवातीला मायक्रोफोन बघून घाबरले होते. तेच या मुलाखतीने काही सोशल मीडिया यूजर्स हैराण झाले आहेत. एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, 'हे केवळ एका धमाक्याचं कारण होतं. हे पूर्णपणे अनावश्यक होतं'.7 / 8एका दुसऱ्या सोशल मीडिया यूजरने लिहिले की, 'या गोष्टी केवळ महिलाच करू शकतात. जर एखाद्या पुरूषाने रेडीओवर असं काही केलं असतं तर कदाचित जगभरातून त्याला विरोध झाला असता'.8 / 8तेच लुईस म्हणाली की, मुलाखत प्रसारित झाल्यावर अनेकांचं तिला समर्थन मिळालं. तिने कोपेनहेगन पोस्टला सांगितलं की, 'लोक माझ्यासाठी इन्स्टाग्राम-फेसबुकवर महान, बहादूर आणि चांगली पत्रकार असे शब्द वापरत आहेत.