पोलिसात पुरूषांचा दबदबा असल्याने सोडली होती नोकरी, आता महिन्याला कमावते दीड कोटी रूपये....
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 11:25 IST
1 / 8असे अनेक प्रोफेशन आहेत जिथे पुरूषांच्या दबदब्यामुळे महिलांना मोकळेपणाने काम करण्याची संधी मिळत नाही. असं केवळ भारतातच होतं असं नाही. यूकेतील एसेक्समध्ये राहणारी २७ वर्षीय चार्लोटे रोजने एका वर्षांपूर्वी पोलिसातील नोकरी सोडली होती. रोज म्हणाली की, पोलीस लाइनमध्ये पुरूषांची चलती होती. कुणीही तिला काम करण्याचं स्वातंत्र देत नव्हतं. त्यामुळे तिने नोकरी सोडली. आता रोज लॉन्जरी मॉडल बनून महिन्याला दीड कोटी रूपये कमावत आहे. नुकतीच रोजने लॅम्बॉर्गिनी कारही खरेदी केली आहे. 2 / 8एसेक्सच्या रोजने पोलिसाची नोकरी सोडली होती. रोज सांगते की, तिथे केवळ पुरूषांचा दबदबा होता. कुणीही तिचं ऐकत नव्हते. अशात तिने राजीनामा दिला. त्यानंतर ती लॉन्जरी मॉडल बनली.3 / 8रोजने ऑनलाइन ओन्ली फॅन्स पेज जॉइन केलं. त्यावर ती रोज तिचे फोटो शेअर करत होती. हळूहळू तिच्या फॅन्सची संख्या वाढली. आता तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.4 / 8ओन्लीफॅन्स पेजवरून रोजची इतकी कमाई होते की, तिने नुकतीच लॅम्बॉर्गिनी कार खरेदी केली. एक वर्षाआधीच तिने नोकरी सोडली होती. हे पेज तिने नोकरी करत असतानाच जॉइन केलं होतं.5 / 8रोजने २०१८ मध्ये ओन्लीफॅन पेजवर फोटो शेअर करणं सुरू केलं होतं. यानंतर तिने पोलिसातील नोकरी सोडली. रोज लॉन्जरी घालून फोटो शेअर करते.6 / 8या पेजवर ती रोज १४ ते १६ तास घालवून महिन्याला दीड कोटी रूपये कमाई करते. ही कमाई ती प्रॉपर्टीमध्ये इन्वेस्ट करते. सोबतच काही बिझनेसही करत आहे.7 / 8आज कोट्यावधी कमाई करणारी रोजला डॉक्टर व्हायचं होतं. पण उंचीमुळे तिने पोलिसात नोकरी स्वीकारली. पण काही वेळातच तिला समजले की, या क्षेत्रात फक्त पुरूषांचा दबदबा आहे. 8 / 8त्यानंतर तिने लॉन्जरी मॉडल म्हणून काम सुरू केलं. आज ती लोकप्रिय तर आहेच सोबतच भरपूर पैसाही कमावते आहे.