शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कौतुकास्पद! पहिल्यांदाच टिव्हीवर अँकरच्या रूपात झळकली ट्रांसजेंडर; इतिहास रचताच अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 6:26 PM

1 / 7
आतापर्यंत तुम्ही टिव्हीवर अनेक महिला आणि पुरूष अँकरर्सना पाहिलं असेल. सध्या सोशल मीडियावर बांग्लादेशच्या एका अँकरचा फोटो व्हायरल होत आहे. त्याला कारणही तसंच आहे, महिला किंवा पुरूष नाही तर एक ट्रांसजेंडर अँकर बनली आहे. बांग्लादेशच्या नॅशनल न्यूज चॅनलवर जेव्हा या महिलेनं न्यूज वाचायला सुरूवात केली तेव्हा संकुचित वृत्तीच्या सगळ्या भिंती तोडून काम करताना प्रेक्षकांना दिसली.
2 / 7
ट्रांसजेंडर तश्रृवा आनन शिशिर यांनी मोठ्या विश्वासाने अँकरप्रमाणे पोशाख करून बुलेटिन पूर्ण केले. यावेळी या तश्रृवा आणि तिच्या सहाकारीवर्गााचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. बांग्लादेशमध्ये जवळपास १.५ मिलियन ट्रांसजेंडर राहतात. हे लोक मोठ्या प्रमाणावर भेदभाव आणि हिंसेचा सामना करतात. आपलं पोट भरण्यासाठी भीक मागणं, शरीर संबंध, व्यापार किंवा गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त होतात.
3 / 7
तश्रृवा आनन शिशिरनं आपल्या अँकरिंगची सुरूवात खासगी चॅनेल बोइशाखी टिव्ही पासून केली. त्यांनी सांगितले की, ''जन्मल्यानंतर किशोरावस्थेत असताना मला मी ट्रांसजेडर असल्याची जाणीव झाली. मलाही लोकांच्या अत्याचाराचा सामना करावा लागला होता. इतकंच नाही तर ४ वर्षांपूर्वी मी आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. माझ्या वडीलांनी अनेक वर्षांपासून माझ्याशी बोलणं बंद केले होतं. त्यानंतर मी घर सोडलं आणि राजधानी ढाकामध्ये येऊन राहिली. ''
4 / 7
पुढे त्यांनी सांगितले की, ''तिथे मी हार्मोन थेरेपीचे काम केले आणि पोट भरायला सुरूवात केली. नंतर सिनेमागृहांमध्येही नोकरी केली. यासोबतच माझा अभ्यासही सुरू होता. जानेवारी महिन्यात ढाका येथील जेम्स पी, ग्रांटस्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये सार्वजनिक आरोग्य या विषयावर अभ्यास करणारी पहिली ट्रांसजेडर ठरली''
5 / 7
बोइशाखी टिव्हीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ''दर्शकांच्या प्रतिकेची जोखिम घेऊन आम्ही ट्रांसजेंडरला स्थान दिलं. हे खूपच ऐतिहासिक पाऊल आहे. ''
6 / 7
शिशिर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी अन्य काही वृत्त वाहिन्यांमध्येही मुलाखत दिली होती.
7 / 7
पण त्यांना तिथं नकार मिळाला, तरिही प्रयत्न करणं मात्र सोडलं नाही. म्हणून आज तश्रृवा या ठिकाणी पोहोचल्या आहेत.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेTransgenderट्रान्सजेंडरLGBTएलजीबीटी