शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वाह, भारीच! मासेमाराच्या हाती लागला २ कोटींचा खजिना; व्हेलच्या उलटीनं नशीबच पालटलं ना राव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 2:13 PM

1 / 9
थायलँडचा रहिवासी असलेल्या एका मासेमाराचे नशीब पालटलं आहे. २० वर्षांच्या चालेरम्चाए महापनला समुद्र किनारी एक अनोखी वस्तू सापडली. ज्याबाबत आतापर्यंत कोणतीही माहिती दिली मिळालेली नाही. जेव्हा हा मुलगा ही वस्तू घरी घेऊन आला त्यावेळी ही वस्तू इतकी मौल्यावान असेल याची कल्पनाही त्याला नव्हती.
2 / 9
साधारणपणे हा मासा सोंगख्लाच्या समीली बीचवर ६ जानेवारीला आढळून आला. त्यानंतर वातावरण चांगले नसल्यामुळे त्यांनी आपले मासे पकडण्याचे काम थांबवून घरी जाण्याची तयारी सुरू केली.
3 / 9
जेव्हा महापनने ही वस्तू पाहिली तेव्हा कोणतातरी साधारण दगड असावा असं त्यांला वाटलं.पण व्यवस्थित पाहिल्यानंतर हा दगड सामान्य नसल्याचे जाणवले. महापन या दगडाबाबत खूप उत्सूक होऊन हा दगड घरी घेऊन आला.
4 / 9
गावातील वरिष्ठ लोकांनी याबाबत विचारणा केल्यास त्यांनी सांगितले की, हा एंबरग्रीस दगड आहे. एंबरग्रीस स्पर्म व्हेलच्या आतड्यांमधील पित्तनळीत असलेल्या स्त्रावापासून तयार होतो. हा दगड मृत व्हेलच्या पोटातसुद्धा दिसून येतो. हा दगड खूप दुर्मिळ असून फक्त १ टक्का व्हेल मासे अशा प्रकारे स्पर्मस बनवू शकतात. एंबरग्रीसची किंमतही खूप जास्त आहे.
5 / 9
व्हेल माशाच्या मोठ्या डोक्यात एक चिकट पदार्थ मिळतो, ज्याला स्पर्मासेटी असं म्हटलं जातं. व्हेलचा शिकार करणाऱ्यांना हे वीर्य वाटतं. त्यामुळे याचं नाव स्पर्म व्हेल पडलं. पूर्णपणे विकसीत झालेली स्पर्म व्हेल एका स्कूल बस एवढी मोठी असते. ४९ ते ५९ फूट लांबी आणि ३५ ते ४५ टन वजन असू शकतं.
6 / 9
व्हेलची प्रत्येक उलटी एम्बरग्रिस नसते. कारण व्हेल स्क्विड आणि कटल फिशची चोच पचवू शकत नाही. हे उलटी करून व्हेल बाहेर काढते. पण अनेकदा हे व्हेलच्या आतड्यांमध्येच राहतं. आतड्यांमध्ये हलल्यानंतर छोटे छोटे तुकडे एकत्र जमा होतात. यात गोंदासारखं काम करतं बाइल. हा व्हेलच्या लिव्हरमधून निघणारा पाचक रस आहे. अशाप्रकारे व्हेलच्या आतड्यांमध्ये एम्बरग्रिस तयार होतं. काही लोकांचं मत आहे की, व्हेल एम्हरग्रिसची उलटी करते तर काही लोक म्हणतात की, हे व्हेल विष्ठेच्या रूपात बाहेर काढते.
7 / 9
एकदा जर स्पर्म व्हेलने एम्बरग्रिस शरीरातून बाहेर काढलं तर त्यावेळी तो चिकट आणि काळ्या रंगाचा पदार्थ असतो. हा पदार्थ पाण्यावर तरंगतो. त्यावेळी यातून दुर्गंधी येऊ लागते. पण कालांतराने समुद्रातील पाण्यामुळे आणि उन्हामुळे याची दुर्गंधी कमी होऊ लागते.
8 / 9
काळ्या रंगाचा पदार्थ आता ग्रे आणि नंतर पांढऱ्या रंगाचा होतो. यावेळी हा पदार्थ मेणासारखा झालेला असतो. जसजसा रंग बदलत जातो तसतशी दुर्गंधीची जागा सुगंध घेऊ लागतो. समुद्रातली लाटांवर तरंगत तरंगत एम्बरग्रिस किनाऱ्यावर येतं. पण अनेकदा याला अनेक वर्ष लागतात. काळानुसार याचा सुगंधही वाढतो. त्यामुळे एम्बरग्रिस जेवढा जास्त वेळ समुद्रावर तंरगेल तेवढी त्याची जास्त किंमत मिळते.
9 / 9
स्पर्म व्हेलमधील कमीच व्हेल एम्बरग्रिस तयार करतात. त्यामुळेच याची इतकी किंमत मिळते. काळ्या एम्बरग्रिसमध्ये एम्बरीन कमी असतं. त्यामुळे याची किंमत कमी असते. रंगासोबतच एम्बरीनचं प्रमाणही वाढतं आणि यालाच सर्वात जास्त किंमत मिळते.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेfishermanमच्छीमारFishermanमच्छीमारSea Routeसागरी महामार्ग