Foreign citizens counting money to participate in Indian weddings
भारतीय विवाहसोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशी नागरिक मोजताहेत पैसे By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 8:26 PM1 / 8भारतातील विवाह सोहळ्यांचा थाट काही औरच असतो. आता तर भारतीय विवाह सोहळ्यांची भुरळ परदेशी नागरिकांनाही पडू लागली आहे. 2 / 8त्यामुळे अनेक परदेशी नागरिका भारतीय विवाह सोहळ्यांमधील थाटमाट पाहण्यासाठी या विवाह सोहळ्यांमध्ये सहभागी होऊ लागले आहेत. 3 / 8भारतीय विवाह सोहळ्यात सहभागी होऊन अस्सल भारतीय पेहराव परिधान करण्याची क्रेझ या परदेशी नागरिकांमध्येही दिसून येत आहे. 4 / 8भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी काही परदेशी नागरिक तर पैसेही मोजत आहेत. 5 / 8परदेशी नागरिकांना भारतीय विवाह सोहळ्याबाबत वाटत असलेल्या आकर्षणामुळे भारतात वेडिंग टुरिझम आकारास येत आहे. 6 / 8जॉइन माय वेडिंग सारख्या साईट्सवरून भारतीय जो़डप्यांना परदेशी नागरिकांना आपल्या विवाह सोहळ्यात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्याची संधी मिळत आहे. 7 / 8जयपूर, दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये वेडिंग टुरिझम वेगाने वाढत आहे. 8 / 8एका दिवसाच्या वेडिंग टुरिझमच्या पॅकेजसाठी सुमारे १० हजार ५०० रुपयांपर्यंत रक्क मोजावी लागते. आणखी वाचा Subscribe to Notifications