शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातील असे काही देश जिथे सेटल होण्यासाठी तेच देतील तुम्हाला पैसे, परदेशात राहण्याचं स्वप्न होईल पूर्ण!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 12:49 PM

1 / 6
Best Place to Settle: अनेकांचं स्वप्न असतं की, आयुष्यात एकदा तरी परदेशात फिरून यावं. पण परदेशात फिरायला जाणं काही स्वस्त नसतं. पण जर तुम्हाला सांगितलं की, तुम्हाला थेट परदेशात सेटल होण्याची संधी आहे तर? जगात असे काही देश आहेत जिथे सेटल होण्यासाठी तुम्हाला काही खर्च करावा लागत नाही. उलट तिथे सेटल होण्यासाठी तेथील सरकार तुम्हालाच पैसे देतात.
2 / 6
जर तुम्हाला स्वस्तात परदेशात सेटल व्हायचं असेल तर तुम्ही ग्रीसच्या एंटीकायथेरा आयलॅंडवर घर बनवू शकता. इथे केवळ 43 हजार रूपयांमध्ये तुम्हाला घर बांधण्यासाठी जमीन मिळू शकते. पण इथे सेटल होण्यासाठी काही नियमांचं पालन करावं लागतं.
3 / 6
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर तुम्हाला अमेरिकेत सेटल व्हायचं असेल तर ओकलाहोमा राज्यातील शहर तुलसा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. इथे सेवल होण्यासाठी तुम्हालाग ग्रॅन्ट म्हणून 7.4 लाख रूपये मिळतील. सोबतच तुम्हाला फ्री डेस्क स्पेस आणि नेटवर्किंग इव्हेंटमध्ये सहभागी होण्याची संधीही मिळले. तसेच अमेरिकेच्य मिनेसोटा राज्यातील बेमिजी शहरात सेटल होण्यासाठी तुम्हाला 1.8 लाख रूपये ग्रॅन्ट म्हणून मिळतील.
4 / 6
इटलीतील कॅंडेला आणि कॅलाबोरिया शहरातही तुम्ही सेटल होऊ शकता. इथे सिंगल व्यक्तीला सेटल होण्यासाठी 1 लाख रूपये ग्रॅन्ट म्हणून दिले जातात. तेच जर फॅमिलीसोबत सेटल व्हायचं असेल तर त्यांना 1.7 लाख रूपये मिळतात. पण इथे केवळ 40 पेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना सेटल होण्याची परवानगी आहे. कॅलाबेरियामध्ये 3 वर्ष राहिले तर 24 लाख रूपयांपेक्षा जास्त ग्रॅन्ट मिळू शकते.
5 / 6
स्पेन हा देश जगात आपल्या सौंदर्यासाठी फार प्रसिद्ध आहे. स्पेनच्या पोंगा टाउनमध्ये सेटल होणार असाल तर तुम्हाला 2.6 लाख रूपये मिळतात. येथील एक खास बाब म्हणजे जर इथे एखाद्या कपलला बाळ झालं तर प्रत्येक बाळाला वेगळे 2.6 लाख रूपये मिळतात. तसेच रूबिया टाउनमध्ये सेटल होण्यासाठी दर महिन्याला ग्रॅन्ट म्हणून 8 हजार रूपये मिळतात.
6 / 6
जर तुमचं वय 45 वर्षापेक्षा कमी आहे तर तुम्ही स्वित्झर्लंडच्या एल्बीनेनमध्ये सेटल होऊ शकता. इथे सेटल होण्यासाठी तुम्हाला 21 लाख रूपयांपेक्षा जास्त मिळतात. पण अट ही असते की, तुम्हाला 10 वर्ष या देशात रहावं लागेल. तसेच इथे सेटल होण्यासाठी तुमच्याकडे स्वित्झर्लंडची नागरिकता हवी. किंवा स्विसच्या नागरिकासोबत लग्न करावं लागेल.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेTravel Tipsट्रॅव्हल टिप्स