Former Russian spy Aliia Roza revealed the secrets of her life as an agent
रशियात नरकापेक्षा कमी नाही Female Agents चं लाइफ, Vladimir Putin च्या माजी गुप्तहेर महिलेवर झाला होता रेप By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2021 3:39 PM1 / 12रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांच्यासाठी गुप्तहेर म्हणून काम करणाऱ्या एका माजी सीक्रेट एजन्टने अनेक धक्कादाक खुलासे केले आहेत. तिने सांगितलं की, कशाप्रकारे रशियात महिला एजन्टवर अत्याचारांचा सामना करावा लागतो. त्यांचं शारीरिक आणि मानसिक शोषण केलं जातं. पण कुणीही याची तक्रार करत नाहीत. जर कुणी असं धाडस केलं तर त्यांना आयुष्यभर तुरूंगात रहावं लागेल.2 / 12आलिया रोजा म्हणते की, रशियातील पोलिसांपेक्षा जास्त गुन्हेगार चांगले असतात. ती म्हणाली की, 'रशियात पोलीस सर्वात जास्त भ्रष्ट आहेत. गुन्हेगारांकडून तुम्ही चांगले असण्याची अपेक्षा करू शकता. मी १९ वयात रशियन पोलीस आणि सेनेचं असं रूप पाहिलं जे शब्दात सांगणं अवघड आहे. मला ते सगळं विसरायचं आहे'.3 / 12आलिया आज प्रिन्स चार्ल्स, लंडन मेअर सादिक खान यांच्यासोबतच अनके सेलिब्रिटींसोबत काम करते. ती तिच्या आयुष्यात खूप आनंदी आहे. पण रशियाची एजन्ट म्हणून तिला ज्या यातना जखमा मिळाल्या त्या अजूनही भरलेल्या नाहीत.4 / 12रशियातील एका सैन्य परिवारात जन्माला आलेल्या आलिया रोजाचे वडील सेनेत जनरल होते आणि त्यांची इच्छा होती की, त्यांच्या मुलीनेही देशाची सेवा करावी.5 / 12वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आलिया रशियन सेनेत सहभागी झाली. पण हा तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट निर्णय होता. ट्रेनिंग अकॅडमीमध्ये तिच्यावर बलात्कार करण्यात आला. पण इच्छा असूनही ती याची तक्रार करू शकत नव्हती.6 / 12 ब्लादिमीरने मृत्यूआधी आलियाला एका व्यक्तीचा नंबर दिला होता. ज्याच्या मदतीने तिने ठिकाण आणि ओळख बदलली. त्यानंतर तिने मॉस्कोमध्ये एका उद्योगपतीसोबत लग्न केलं. पण एका प्रकरणात तिच्या पतीला अटक झाली आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. यानंतर आलिया सगळं काही विकून स्वित्झर्लॅंड आणि नंतर लंडनला गेली. आज ती अमेरिकेतील फॅशन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे.7 / 12आलियाने सांगितलं की, 'मी तक्रार केली असती तर कुणाकडे केली असती. पूर्ण सिस्टीम भ्रष्ट आहे. राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांच्या ट्रेनिंग अकॅडमीमध्ये महिला एजन्ट्सना या कलेत पारंगत केलं जातं की, पुरूषांना आपल्या जाळ्यात कसं ओढायचं, त्यांना जाळ्यात अडकवून माहिती कशी काढायची. 8 / 12ती म्हणाली की, 'मला माझ्या पहिल्या टास्कमद्ये स्वत:ला सेक्स वर्करसारखं सादर करायला सांगण्यात आलं. जेणेकरून क्लबमध्ये जाऊन ड्रग्स गॅंगच्या लोकांना फसवू शकू. २००४ मध्ये एका टॉप सीक्रेट मिशन दरम्या आलियाची भेट एका गॅंग लीडरसोबत झाली. ज्याचं नाव त्यांनी ब्लादिमीर ठेवलं.9 / 12या मिशनवेळी आलिया आणि ब्लादिमीर जवळ आले होते. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पण लवकरच आलियाचं सत्य ब्लादिमीरच्या गॅंगला समजलं. गॅंगमधील लोक तिला मारणार होते, पण ब्लादिमीरने तिला वाचवलं. काही दिवसांनी ब्लादिमीरची हत्या झाली.10 / 12आलियाला आजपर्यंत समजलं नाही की, ब्लादिमीरला त्याच्याच साथीदारांनी मारलं की दुसऱ्या एजन्टने. या मिशननंतर आलियाबाबत अधिकाऱ्यांचा दृष्टीकोन बदलला. त्यांना आलियावर संशय होता.11 / 12 ब्लादिमीरने मृत्यूआधी आलियाला एका व्यक्तीचा नंबर दिला होता. ज्याच्या मदतीने तिने ठिकाण आणि ओळख बदलली. त्यानंतर तिने मॉस्कोमध्ये एका उद्योगपतीसोबत लग्न केलं. पण एका प्रकरणात तिच्या पतीला अटक झाली आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. यानंतर आलिया सगळं काही विकून स्वित्झर्लॅंड आणि नंतर लंडनला गेली. आज ती अमेरिकेतील फॅशन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे.12 / 12आलिया रोजा म्हणते की, रशियातील पोलिसांपेक्षा जास्त गुन्हेगार चांगले असतात. ती म्हणाली की, 'रशियात पोलीस सर्वात जास्त भ्रष्ट आहेत. गुन्हेगारांकडून तुम्ही चांगले असण्याची अपेक्षा करू शकता. मी १९ वयात रशियन पोलीस आणि सेनेचं असं रूप पाहिलं जे शब्दात सांगणं अवघड आहे. मला ते सगळं विसरायचं आहे'. आणखी वाचा Subscribe to Notifications