शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

६२ वर्षांपूर्वी चीनच्या 'या' चुकीमुळे कोट्यावधी लोकांना गमवावा लागला जीव....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 3:17 PM

1 / 10
सध्या चीनमधून संपूर्ण जगभरात पसरत असलेल्या कोरोना व्हायरसमुळे हजारो लोकांना आपला जीव गमावावा लागत आहे. तसंच मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज आम्ही तुम्हाला चीनच्या एका चुकीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता याबाबत सांगणार आहोत. डास, माश्या आणि उंदारांना मारणं थोडं कठीण काम आहे. कारण ते सहजतेने स्वतःला लपवू शकतात. पण चिमण्यांना नेहमी माणसांमध्ये राहायला, उडायला आवडत असतं. याच चिमण्या माओ जेडॉन्ग यांच्या आदेशाच्या शिकार बनल्या होत्या. संपूर्ण चीनमध्ये चिमण्यांना शोधून शोधून मारण्याचं काम सुरू होतं.
2 / 10
इतकंच नाही तर चिमण्यांचे घरटे सुद्धा नष्ट करण्यात आले होते. काहीच जीवंत वाचले नव्हते. लोक भांडी, ड्रम जे मिळेल ते वाजवून चिमण्यांना हाकलण्याच्या प्रयत्नात होते. कुठेही चिमण्यांना बसू सुद्धा देत नव्हत्या. जोपर्यंत चिमण्या उडून उडून थकून मरत नाही तोपर्यंत हे लोक चिमण्यांना त्रास देणं सोडत नव्हते.
3 / 10
ज्या व्यक्तीने चिमण्या मारल्या अशा व्यक्तीला बक्षिस सुद्धा दिलं जायचं. याच लालसेपोटी चिनी लोकांनी जे केलं त्याचा तुम्ही विचार सुद्धा करू शकतं नाही.
4 / 10
एकदा चिमण्या एकत्रितपणे बीजिंगमधील पोलँडच्या वनात लपल्या होत्या. पण चीनी लोक त्यांना मारण्यासाठी तिथे सुद्धा पोहोचले. अधिकारी लोकांनी त्यांना आत येऊ दिलं नाही. तरी सुद्धा त्यांनी चिमण्यांना मारण्याची ट्रिक शोधून काढली. त्यांनी या ठिकाणी ड्रम वाजवायला सुरुवात केली.
5 / 10
हे सगळं जवळपास २ दिवसांपर्यंत चालू होतें. शेवटी चिमण्या जास्त आवजामुळे मरण पावल्या. त्यानंतर साफ-सफाई करत असलेल्या लोकांनी मेलेल्या चिमण्यांना बाहेर फेकून दिलं.
6 / 10
१९६० मध्ये माओ जेडॉन्ग यांनी हे पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेतला. एका प्रसिध्द पक्षीतज्ञांनी सांगितलं की चिमण्या अन्नधान्याला नुकसान पोहोचवत असलेल्या किंड्यांना खाऊन टाकतात. त्यानंतर माओ यांनी आदेश दिला की चिमण्यांना मारलं न जाता अन्न-धान्यांवर बसत असलेल्या किड्यांना मारलं जाईल.
7 / 10
पण तोर्यंत खूप उशीर झाला होता. चिमण्या नसल्यामुळे किंड्याच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे पीकांची नासाडी होत होती. चीनमध्ये करोडो लोक हे उपासमारीने मरत होते.
8 / 10
चीनी सरकारच्या आकडेवारीनुसार १५ कोटी लोकांचा मृत्यू उपासमारीमुळे झाला.
9 / 10
या चुकीमुळे चीनमधील कोट्यावधी लोकांना आपली जीव गमवावा लागला होता.(image credit- social media)
10 / 10
या चुकीमुळे चीनमधील कोट्यावधी लोकांना आपली जीव गमवावा लागला होता.(image credit- social media)
टॅग्स :Jara hatkeजरा हटके